फोटोच्या नादात युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

पवनार (जि. वर्धा) : येथील धाम नदी परिसरात फिरायला आलेल्या चार मित्रापैकी एकाचा नदीपात्रात तोल गेल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. 21) दुपारच्या सुमारास घडली. राहुल खोडके (वय 33) रा. बोरगाव (मेघे) वर्धा असे मृत युवकाचे नाव आहे.

पवनार (जि. वर्धा) : येथील धाम नदी परिसरात फिरायला आलेल्या चार मित्रापैकी एकाचा नदीपात्रात तोल गेल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. 21) दुपारच्या सुमारास घडली. राहुल खोडके (वय 33) रा. बोरगाव (मेघे) वर्धा असे मृत युवकाचे नाव आहे.
राहुल हा त्याचा मित्र आशीष भाजीपाले (वय 20), दीपाली तिसरडे (वय 34) प्रणाली भिसे (वय 17) यांच्यासह येथे याला होता. दरम्यान राहुल हा नदीपात्राच्या काठावर उभा होता तर अन्य त्याचे फोटो काढत होते. मात्र, या नादात राहुलचा पाय घसरला आणि तो गांधी-विनोबा यांच्या समाधीस्थळाजवळ असलेल्या गायमुख या डोहात पडला. येथे सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे खडकात निर्माण झालेल्या पोकळीत जाऊन तो अडकला. त्याला वाचवायला आशीष भाजीपाले याने पाण्यात उडी घेतली. पण त्याला अपयश आले. यात आशीषही बुडायला लागला. मात्र, त्याला वाचविण्यात यश आले. या घटनेची माहिती मिळताच सेवाग्राम पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय बोठे हे कर्मचाऱ्यासह घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामाम करीत मृतदेह काढून तो उत्तरीय तपासणीकरिता रवाना करण्यात आला. पुढील तपास सेवाग्राम पोलिस करीत आहे.
राहुल खोडके गायमुख या डोहात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह या डोहात अडकून होता. मृतदेहाला बाहेर काढण्याकरिता पवनार येथील अशोक मने, प्रवीण बोरकर, अनिल भट, बार्शीराम हजारे, लक्ष्मण खंगार यांना पाचारण करण्यात आले होते.
पवनारच्या तरुणाने वाचविले आशीषला
आशीष भाजीपाले याने राहुलला वाचविण्याकरिता डोहात उडी घेतली. पण, तो गटांगळ्या खायला लागला. तो बुडत असताना पवनार येथील भारत पटेल याला दिसताच त्याने जिवाची बाजी लावत पाण्यात उडी घेत त्याला बाहेर काढले. भारतने राहुलाचा शोध घेत त्यालाही वाचविण्याचे प्रयत्न केले. मात्र, तो खडकामध्ये अडकल्या गेल्याने त्याचा मृत्यू झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man dies in water

टॅग्स