अमरावतीत युवकाची हत्या

file photo
file photo

अमरावती : महादेवखोरी येथील न्यू प्रिया कॉलनीत दारूच्या नशेत धुमाकूळ घालणाऱ्या युवकाला घरात बांधल्यावर पाइपने जबर मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना शुक्रवारी (ता. 20) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली.
प्रमोद नामदेव लोणारे (वय 25 रा. धामणगाव-देव, जि. यवतमाळ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी मृत प्रमोदचे वडील नामदेव लोणारे यांच्या तक्रारीवरून संशयित अनिल भगवान धनद्रव्य (वय 32), पत्नी दीपमाला अनिल धनद्रव्य (वय 28) आणि अनिलचा नातेवाइक अमोल परसराम वरघट (वय 37 सर्व रा. ह. मु. प्रिया कॉलनी, महादेवखोरी) या तिघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. लोणारे, धनद्रव्य दाम्पत्य व वरघट हे तिघेही मूळ यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा तालुक्‍यातील धामणगाव (देव) येथील मूळ रहिवासी आहेत. काही दिवसांपासून ते महादेवखोरी परिसरात न्यू प्रिया कॉलनीत राहतात. मजुरी करून कुटुंब चालवितात. प्रमोद हा मुंबई येथे पेंटिंगची कामे करतो. ओळखी असल्यामुळे तो नेहमीच अनिलच्या घरी यायचा. गुरुवारी (ता. 19) रात्री प्रमोद दारू पिऊन अनिलकडे गेला. त्याने अनिल व त्याच्या पत्नीला शिवीगाळ केली. प्रमोद गोंधळ घालत असल्यामुळे आटोक्‍यात आणण्यासाठी धनद्रव्य दाम्पत्यासह अमोल वरघट या तिघांनी प्रमोदचे हातपाय बांधून बेदम मारहाण केली. गंभीर जखमी प्रमोदला घरातच ठेवले. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा प्रमोदचा मृत्यू झाल्याचे निदर्शनात आले. अनिल, दीपमाला व अनिलचा साडभाऊ अमोल या तिघांची सखोल चौकशी केली असता, त्यांनी खुनाची कबुली दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com