अंगावर झाड कोसळून पिंपळखुटाचा तरुण ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

बोरीअरब (जि. यवतमाळ) : दारव्हा-यवतमाळ मार्गावरील बानायत येथे झाड दुचाकीवर कोसळून तरुण मुलगा जागीच ठार झाला, तर वडील गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (ता.26) सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली.
संजय प्रकाश चव्हाण (वय 25) असे मृताचे तर प्रकाश बबन चव्हाण (रा. पिंपळखुटा) असे जखमीचे नाव आहे. जखमी प्रकाश चव्हाण यांच्यावर यवतमाळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघेही दुचाकीने यवतमाळला जात असताना लाडखेड शिवारातील बानायत येथे ही घटना घडली. जेसीबीने केबलसाठी झाडालगत खोदकाम करताना झाडाची मुळे सैल झाल्याने झाड दुचाकीवर कोसळले. जेसीबी मालकावर लाडखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young man killed by falling tree