वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू

आरमोरी तालुक्यातील इंजेवारी येथील घटना
वाघाच्या हल्ल्यात मृत्यू
वाघाच्या हल्ल्यात मृत्यू sakal

आरमोरी (जि. गडचिरोली) - आरमोरी तालुक्यातील इंजेवारी येथील जंगल परिसरात सरपणासाठी गेलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना गुरुवारी (ता. १६) सकाळच्या सुमारास घडली. वासुदेव मुरलीधर मेश्राम (वय ३६, रा. इंजेवारी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

आरमोरी वनपरिक्षेत्रातील इंजेवारी येथील वासुदेव मेश्राम हे सकाळी सायकलने इंजेवारी-सिर्शी रस्त्यालगत असलेल्या जंगलात सरपणासाठी गेले होते. यादरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून जंगलात नेले. ही घटना इंजेवारी गावापासून अवघ्या एक ते दीड किमी अंतरावर घडली. दरम्यान, रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने हे दृश्य पाहून गावात माहिती दिली. वनविभागालाही माहिती देण्यात आली. मात्र, तोपर्यंत वाघाने मेश्राम यांचा बळी घेतला होता. मागील महिन्यात आरमोरीजवळील अरसोडा येथील महिला शेतकरी, तसेच आरमोरी येथील एका शेतकऱ्यांचा वाघाने बळी घेतला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com