आजनीत तरुणाचा मृतदेह आढळला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

कामठी (जि. नागपूर): स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीतील आजनी (रडके) येथील एका घरावर तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबड उडली. तरुणाची हत्या की आत्महत्या, याचे गूढ रहस्य अजूनही कायम आहे. राकेश शंकर उंबरकर (वय 24, रा. आजनी, ता. कामठी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत भिवापूर तालुक्‍यातील नक्षी गावाचा रहिवासी आहे. वयाच्या पाच वर्षांपासूनच कामठी तालुक्‍यातील आजनी गावातील रहिवासी मोठी आई राधाबाई रामभाऊ काकडेंकडे वास्तव्यास होता. तसेच जुनी ओली कामठी येथील ओम किराणा स्टोर्स येथे कामावर होता. गणेश विसर्जन असल्याने तो कामावर गेला नव्हता. शुक्रवारी सकाळी त्याच्या घरची मंडळी सकाळी उठल्यावर राकेश घरात दिसून आला नाही. त्यामुळे त्याची मोठी आई त्याला बघण्यासाठी घराच्या छतावर गेली असता तो छताच्या लोखंडी साखळीला एका लहानशा पांढऱ्या रंगाच्या हातरुमालाने गळा बांधून व गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने मृतावस्थेत दिसून आला. याची माहिती कामठी पोलिसांना देण्यात आली असून हत्या की आत्महत्या, या चर्चेला उधाण आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man's body was found today