गोंदियात घर कोसळून युवतीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

गोंदिया : येथील कृष्णपुरा वॉर्डातील कला लारोकर (वय 49) यांचे घर कोसळून त्यांची मुलगी चांदणी लारोकर (वय 23) हिचा मृत्यू झाला. या घटनेत कला लारोकर जखमी झाल्या. ही घटना सोमवारी (ता. 23) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.
शहरात आठवडाभरापासून दररोज तुरळक पाऊस सुरू आहे. या पावसामुळे त्यांचे झोपडीवजा घर पूर्वीच खचले होते. सोमवारी मायलेकी घरात असताना अचानक त्यांचे घर कोसळले. दोघीही मलब्याखाली दबल्या गेल्या. चांदणी गंभीर अवस्थेत असल्याने तिला नागपूरला हलवीत असताना वाटेत गोरेगावजवळ तिचा मृत्यू झाला. शासनाने तिच्या कुटुंबीयाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young woman dies after crashing house in Gondia

टॅग्स