esakal | दत्तरामपूर येथील तरुणीचा सर्पदंशाने मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

दत्तरामपूर येथील तरुणीचा सर्पदंशाने मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आर्णी (जि. यवतमाळ) : शेतातून घरी आल्यानंतर दळण निवडत असताना साडेपाच फुटांच्या विषारी नागाने तरुणीच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला चावा घेतला.
उपचारादरम्यान तरुणीचा यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. सर्पदंश झाल्याची घटना दत्तरामपूर येथे शुक्रवारी (ता.23) दुपारी चारला घडली.
प्रियंका शंकर डाके (वय 20, रा. दत्तरामपूर), असे मृत तरुणीचे नाव आहे. दळण निवडत असताना सापाने तिला दंश केला. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच तिला ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, पुढील उपचारासाठी प्रियंकाला यवतमाळला हलविण्यात आले. उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने सायंकाळी सहाला तिचा मृत्यू झाला. शनिवारी (ता.24) शविच्छेदन झाल्यानंतर प्रियंकावर राहत्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रियंका मजुरी करून कुटुंबाला हातभार लावीत होती. तिच्या पश्‍चात आई, वडील, एक भाऊ, बहिण व बराच मोठा आप्त परिवार आहे. डाके कुटुंबाला शासनाकडून मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.
नागोबाला जीवदान
दत्तरामपूर येथील प्रियंका डाके हिला सर्पदंश झाल्याची माहिती मिळताच सर्पमित्रांनी घटनास्थळ गाठले. आकाश दाबणे, अनिकेत पंडीत, धीरज मुजमूले यांनी डाके यांच्या घरातील साडेपाच फूट लांबीच्या विषारी नागाला जीवंत पकडले. त्यानंतर पेंटर बाबा दर्गा जवळीक जंगलात सोडून जीवदान दिले.

loading image
go to top