युवतीवर दारू पाजून बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

नागपूर : फेसबुकवरून ओळखी झाल्यानंतर युवकाने युवतीला दारू पाजून मित्रासह बलात्कार केला. कुणालाही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. युवतीची प्रकृती बिघडल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी प्रियकरासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल अटक केली आहे. निखिल सोमकुंवर (वय 25, उत्कर्षनगर, चिंतामणी नगरी) आणि वतन गोमकाळे (वय 25) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 18 वर्षीय युवती मोनाली (बदललेले नाव) ही बी. कॉम.ची विद्यार्थिनी आहे. तिला वडील नसून आई शासकीय नोकरीत आहे. मोनाली हिची फेसबुकवरून आरोपी निखिल सोमकुवरशी मैत्री झाली. दोघांची अनेक दिवस चॅटिंग सुरू होती. निखिल हा एका खासगी कंपनीत मॅनेजर आहे. दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेत फोनवरून संबंध वाढविले. तर काही दिवसांपूर्वी दोघांनी फुटाळा तलावावर एकमेकांची भेट घेतली. दोघेही दिवसभर फिरल्यानंतर घरी गेले. 15 जुलैला निखिल हा युवतीच्या फ्लॅटवर आला. त्याने सोबत बिअरची बॉटल आणली. दोघांनी बिअर ढोसली. त्यानंतर दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो घरी निघून गेला. 19 जुलैला निखिल आणि त्याचा मित्र वतन गोमकाळे हे दोघे मोनालीच्या घरी आले. त्यांनी सोबत चिकन आणि दारू आणली होती. दोघांनीही दारू ढोसली. त्यानंतर मोनालीलाही दारू पिण्यास भाग पाडले. त्यानंतर दोघांनीही मोनालीवर सामूहिक बलात्कार केला. ही बाब उघडकीस येताच युवतीच्या आईने बेलतरोडी पोलिस ठाण्यात दोन्ही युवकांविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी दोन्ही युवकांना अटक केली.
आईच्या सकर्ततेने घटना उघडकीस
दारू आणि दोघांचा अत्याचार सहन न झालेल्या मोनालीची प्रकृती बिघडली. पहिले दोन दिवस आईने तिच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, तिची प्रकृती बरीच बिघडल्यामुळे तिला डॉक्‍टरकडे नेण्यात आले. डॉक्‍टरांच्या हा प्रकार लक्षात आला. डॉक्‍टरांनी आईला सांगताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. लगेच आईने अन्य नातेवाइकांना बोलावून पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young woman raped