दहीहंडी कार्यक्रमात केतकी माटेगावकरसह थिरकली तरूणाई 

ketki
ketki

चिमूर : स्व. गोटूलाल भांगडीया व स्व. धुपादेवी भांगडीया यांच्या स्मृती प्रित्यर्थच्या नेहरू विद्यालयमधील प्रांगणात भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन कार्यक्रमात मराठी चित्रपट सृष्टीत गाजलेल्या 'तानी' या चित्रपटाद्वारे आपल्या अप्रतिम आणि नैसर्गिक अभिनयाने नावलौकिक मिळविलेल्या केतकी माटेगावकरनो संवाद साधला. यावेळी तिने टाईमपास या चित्रपटातील प्रसिद्ध गीत ''वेड लागले, प्रेमाचे'' सादर केले. ज्यावर उपस्थित तरूणाई बेधुंद होऊन थिरकली


चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी दरवर्षी प्रमाणे आपल्या आजी आजोबांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजीत केलेल्या दहीहंडी स्पर्धा कार्यक्रमा करीता कार्यक्रमाचे अध्यक्ष किर्तीकुमार भांगडिया, मुख्य आकर्षण मराठी सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर, भाजप जेष्ठ नेते वसंत वारजूकर, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती तथा भाजयुमो जिल्हा अध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे ,श्रीहरी बालाजी देवस्थान पंच कमेटी अध्यक्ष नीलम राचलवार, अल्पसंख्याक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष जुनेदखान, भाजप तालुका अध्यक्ष डॉ दिलीप शिवरकर, नागभीड भाजप तालुका अध्यक्ष होमदेव मेश्राम, महिला आघाडी तालुका अध्यक्ष गीता लिंगायत, महामंत्री ज्योती ठाकरे, बकारामजी मालोदे, जिल्हा परिषद सदस्य मनोज ममिडवार, नगर परिषद गट नेत्या छाया कंचर्लावार , इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

नियोजित कार्यक्रमाकरिता प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर येणार होत्या मात्र काही कारणास्तव त्या न येऊ शकल्याने त्याऐवजी केतकी माटेगावकर या उपस्थित राहिल्या.  दरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाल्या की, तानी चित्रपटाचे चित्रिकरण विदर्भात झाले असल्याने एक अतुट नाते या परिसराशी जुळले आहे. टाईमपास थ्री ची निर्मिती झाल्यास चिमूर परिसरातून चित्रीकरण करण्याचा मानस व्यक्त करीत येणाऱ्या काळात गोरगरीब कुटुंबातील लहान मुले व महिलांच्या आरोग्यासाठी एक फाऊंडेशन सुरू करणार असल्याचे सांगितले .

आयोजित दहीहंडी कार्यक्रमा दरम्यान गोविंदा गोविंदाच्या जल्लोषाने वातावरण उत्साहमय झाले होते. स्पर्धेत एकुण तिन मंडळानी भाग घेतला त्यापैकी प्रथम बक्षीस रोख पंधरा हजार व चषक शितलमाता मंडळ, चंद्रपुर ,द्वितिय बक्षीस रोख दहा हजार  व चषक दुर्गा हनुमान मंडळ , चंद्रपूर, तृतिय बक्षीस रोख पाच हजार  वाल्मिक मंडळ, चिमूर यांनी पटकाविले  कार्यक्रमाचे संचालन पंचायत समिती सदस्य अझहर शेख तर आभार नैनेश पटेल यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com