तरूणाईच्या डाेळ्यातील पाणी आटले

eye
eye

अकाेला : रात्रंदिवस माेबाईलचा वाढता वापर अन् धूळ प्रदूषणामुळे तरूणाईच्या डाेळ्यातील पाणी आटायला लागले आहे. हा आजार म्हणजे ‘ड्राय आय सिंड्राेम’ असून, विदर्भातील सुमारे दाेन लाखांच्यावर तरूणाई यापासून ग्रस्त असल्याचे समाेर आले आहे.

पूर्वी उतरत्या वयात ‘ड्राय आय सिंड्राेम’ हा आजार उद्‍भवत हाेता. परंतु, हल्ली मानवी चुकांमुळे 15 ते 30 वयाेगटातील तरुणाईला या आजाराने विळख्यात घेतले आहे. हा विळखा ताेडायचा तरी कसा, हा गंभीर ग्रश्न नेत्र तज्ज्ञांपुढे उपस्थित झाला आहे. शहरातील धूळ व प्रदूषण यासाठी सर्वाधिक जबाबदार असले, तरी माेबाईल अन् संगणकाचा वाढता वापरही घातक ठरत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस तरुणाईत या आजाराचे प्रमाण वाढत आहे. यापासून स्वत:चा बचाव करायचा असेल, तर माेबाईल, संगणकाचा अती वापर टाळा, असे आवाहन नेत्रतज्ज्ञांनी केले आहे.

हवामान, प्रदूषण महत्त्वाचे कारण
जिल्ह्यातील हवामान काेरडे आहे. अशा हवामानात तुम्ही विनाचष्मा दुचाकी चालवत असाल, तर दरराेज तुम्ही तुमच्या डाेळ्यातील पाणी काही अंशी कमी करत आहात. एकदा डाेळ्यातील पाणी कमी झाले की, त्याचा दुषपरिणाम थेट नजरेवर हाेताे. त्यामुळे वाहन चालवताना चष्मा किंवा गॉगल वापरणे हिताचे ठरते. डाेळे सुरक्षित ठेवण्यासाठी हे जाणिवपूर्वक करा.

हे करा
- माेबाईलचा अती वापर टाळा
- संगणकावर काम करताना दीड दाेन तासांनी विश्रांती घ्या
- बाहेर जाताना गॉगल्सचा वापर करा
- थंड पाण्याने डाेळे धुवा

याकडे लक्ष ठेवा
- डाेळे काेरडे पडणे
- सतत डाेळे खाजवणे
- डाेळे लालसर हाेणे
- पापण्यांचे लवणे कमी हाेणे

ड्राय आय सिंड्राेमचा त्रास पूर्वी ज्येष्ठांना व्हायचा. परंतु, तरूणाईमध्ये माेबाईल, संगणकाचा वापर वाढला आहे. त्यामुळे या वयागटातही डाेळ्यातील पाणी आटण्याचा प्रकार वाढत आहे. हा आजार हाेऊ नये म्हणून लहान मुलांसाेबतच तरूणांनी देखील माेबाईलचा वापर कमी करावा. तसेच बाहेर जाताना डाेळ्यांच्या संरक्षणासाठी गाॅगल्सचा उपयाेग करावा.
- डॉ. गजानन भगत, नेत्र तज्ज्ञ, अकाेला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com