किशाेरवयीन मुलं व्यसनाच्या विळख्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

का असं हाेतं?
किशाेरवयीन मुलं नेहमीच माेठ्यांचं परीक्षण करतात. विभक्त कुटुंब अन् आई वडील दाेघेही नाेकरीवर जात असल्याने मुलं एकाकी पडतात. त्यामुळे परिसरात घडणाऱ्या वाईट गाेष्टींचा त्यांच्या मनावर प्रभाव पडताे. यातच व्यसनाधीन व्यक्तिची संगत लाभल्यास मुलांनाही अम्लीय पदार्थ सेवनाची सवय लागते.   

अकाेला : वयाच्या १५ ते २० वर्ष वयाेगटातील किशाेरवयीन मुलं झपाट्यानं व्यसनाधिनतेचे शिकार ठरत अाहे. त्यांच्या मानसिकतेमध्येही बदल हाेत आहे. हे धक्कादायक वास्तव गत वर्षभरात मानसाेपचार तज्ज्ञांकडे वाढलेल्या व्यसनाधीन किशाेरवयीन रुग्णांच्या संख्येवरून समाेर आलं. वयाच्या १५ ते २० वर्ष वयाेगटात मुलांमध्ये शारीरिक व मानसिक बदल झपाट्याने हाेतात. 

किशाेरवयीन मुलांमध्ये व्यसनाधीनतेचे वाढते प्रमाण हे पालकांसाठी आव्हानात्मक आहे. यावर नियंत्रण आणायचे असेल, तर पालकांची महत्त्वाची भूमीका ठरणार आहे. याेग्य वेळी याेग्य उपचार करणे आवश्यक असले, तरी समुपदेशन गरजेचे आहे. 
- डॉ. अनुपकुमार राठी, मानसाेपचार तज्ज्ञ

का असं हाेतं?
किशाेरवयीन मुलं नेहमीच माेठ्यांचं परीक्षण करतात. विभक्त कुटुंब अन् आई वडील दाेघेही नाेकरीवर जात असल्याने मुलं एकाकी पडतात. त्यामुळे परिसरात घडणाऱ्या वाईट गाेष्टींचा त्यांच्या मनावर प्रभाव पडताे. यातच व्यसनाधीन व्यक्तिची संगत लाभल्यास मुलांनाही अम्लीय पदार्थ सेवनाची सवय लागते.   

असे आले निदर्शनास
व्यसनाधीनतेमुळे किशाेरवयीन मुलांच्या मानसिकतेत पालकांना बदल जाणवू लागले. त्यामुळे पालकांनी मुलांना समुपदेशनासाठी मानसाेपचार तज्ज्ञांचा सल्ला व त्यावर उपचारासही सुरुवात केली. अकाेलाच नव्हे तर वाशीम, बुलडाणा, नागपूर व इतर शहरातील किशाेरवयीन मुलं उपचारासाठी अकाेल्यातील मानसाेपचार तज्ज्ञांकडे आले. गत वर्षभरात हे प्रमाण वाढल्यानं हा प्रकार निदर्शनास आला.

Web Title: youth addicition