युवक कॉंग्रेसची निवडणूक जुलैमध्ये

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

अकोला - युवक कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या कार्यक्रमानुसार जुलैमध्ये लोकसभा, विधानसभा मतदारसंघ पातळीवरील आणि इतर पदाधिकाऱ्यांची निवडणूक होईल. या निवडणुकीमध्ये अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांतील अध्यक्षपद अनुसूचित जाती, जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

देशभरात जुलै महिन्यात युवक कॉंग्रेसच्या प्रदेश, विधानसभा व लोकसभा मतदारसंघ पातळीवरील निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षातील नव्या दमाच्या युवकांना सुवर्ण संधी मिळणार आहे.

त्यानिमित्ताने कॉंग्रेसचे निवडणूक निरीक्षक मोहम्मद ताज रविवारी अकोल्यात आले होते. युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीसंदर्भातील आढावा त्यांनी घेतला. ही निवडणूक प्रदेश, जिल्हा, विधानसभा व लोकसभा क्षेत्रांसाठी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यात सदस्यांना ऑनलाइन वा पारंपरिक पद्धतीने मतदान करता येणार आहे. विधानसभा क्षेत्रासाठी पंधरा जणांची कार्यकारिणी गठित केली जाईल. जिल्हा कमेटी ही सोळा सदस्यांची राहील. राज्य समितीत सोळा सदस्यांची वर्णी लागणार आहे.

Web Title: youth congress election in july politics