इंधन दरवाढीविरोधात आज युवक कॉंग्रेसचा एल्गार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

अकोला - इंधन दरवाढीने होरपळलेल्या जनतेवर दरकपातीची तात्पुरती मलमपट्टी करण्याचे ढोंग आणण्यापेक्षा सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा जीएसटीमध्ये समावेश करावा आणि राज्य व केंद्राने लावलेले उपकर रद्द करून सामान्य जनतेला स्वस्त डिझेल, पेट्रोल आणि गॅस उपलब्ध करून द्यावे, यासाठी युवक कॉंग्रेस गुरुवारी (ता. 11) राज्यभर आंदोलन करणार आहे.

इंधन दरवाढीसंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावरील दरवाढीचा जो संदर्भ भाजपकडून दिला जातो आहे, तो धादांत खोटा आहे. प्रत्यक्षात कॉंग्रेस सरकारच्या काळात कच्च्या तेलाचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दर 103 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत पोचले होते. 2010 ते 2014 या काळात हे दर 95 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत स्थिर होते. आज हेच दर 42 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत खाली आले आहेत. याचा सरळ अर्थ अंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर निम्म्याने घटले आहे. असे असतानाही सरकार सामान्यांची घोर फसवणूक करत आहे, असा आरोप युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केला आहे.

Web Title: Youth Congress Elgar for Fuel rate Increase