युकॉं कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

चंद्रपूर : महाजनादेश यात्रेनिमित्त चंद्रपुरात आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. ही घटना सोमवारी (ता. 5) दुपारच्या सुमारास येथील जनता कॉलेज चौकात घडली.

चंद्रपूर : महाजनादेश यात्रेनिमित्त चंद्रपुरात आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. ही घटना सोमवारी (ता. 5) दुपारच्या सुमारास येथील जनता कॉलेज चौकात घडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील पाच वर्षांत करण्यात आलेली विकासकामे जनतेसमोर मांडण्यासाठी महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. यात्रेचा पहिला टप्पा विदर्भात सध्या सुरू आहे. सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यात यात्रेचे भाजप कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. चांदा क्‍लब मैदानावर दुपारी जाहीर सभा झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची यात्रा वरोराच्या दिशेने निघाली. त्यानंतर जनता महाविद्यालय चौकात शिवा राव यांच्या मार्गदर्शनात युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरीश कोत्तावार, विधानसभा अध्यक्ष राजेश अडूर यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री फडणवीस यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. अचानकपणे झालेल्या आंदोलनामुळे पोलिस विभागाची चांगलीच तारांबळ उडाली. काही वेळानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून कार्यकर्त्यांना ताब्यात घेत अटक केली. तसेच काळे झेंडे जप्त केले. यावेळी जिल्हा महासचिव वहिद शेख, अजय चिन्नूरवार, सुमेध चंदनखेडे, घुग्घुस शहराध्यक्ष तौफीक शेख, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रय, अनिकेत अग्रवाल, राजन कोडाम, व्यंकटेश कलवल, संतोष वर्मा, कुणाल मेश्राम यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची अटक करून सुटका करण्यात आली.
वरोऱ्यातील कॉंग्रेस कार्यकर्ते स्थानबद्ध
महाजनादेश यात्रेला विरोध केला जाणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले. यात जिल्हा महासचिव डॉ. हेमंत खापणे, वसंत विधाते, अनिल झोटिंग, राहुल देवळे, सय्यद आसीफ रज्जाक, छोटू शेख, विनोद निकुरे, सचिन मेश्राम, शकील शेखए साहेबराव ठाकरे, याकूप आझाद शेख यांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth congress workers shows black flags to cm