यवतमाळ : रानडुकराच्या हल्ल्यात शेतमजूर तरुण ठार

dead body
dead body

आर्णी (जि. यवतमाळ) : तालुक्यातील तेंडोळी येथील शेतमजूर संतोष सकरू राठोड (वय 40) हा दाभडी जंगलात जळतन आणण्यासाठी गेला होता. मात्र, त्याच्यावर रानडुकराने हल्ला केल्याने तो ठार झाला. ही घटना आज मंगळवारी (ता.7) सकाळी साडेसहाच्या सुमारास दाभडी जंगलात घडली.

संतोष हा जळतन आणण्यासाठी दाभडी जंगलात सकाळी पाच वाजताच सायकल घेऊन घरातून निघाला. दाभडी जंगलाच्या दिशेने गेला असता, रानडुकराने त्याच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यानंतर त्याने आरडाओरड केली असता, आजूबाजूच्या ग्रामस्थांनी त्याला उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. याबाबतची माहिती गावचे पोलिस पाटील प्रफुल्ल गंडाईत यांनी दिली. दरम्यान, संतोष हा रोज मजुरी करून आपल्या कुटुंबीयांची जबाबदारी पार पाडत होता. त्याच्या मागे पत्नी व सहा मुली आहेत. संतोषच्या जाण्याने त्याचे कुटुंबीय उघड्यावर आले आहे. 

संतोष राठोड हा जळतन आणण्यासाठी जंगलात गेला होता. त्याचवेळी त्याच्यावर वन्यप्राण्याने हल्ला केला. हल्ला करणारे वन्यप्राणी हे रानडुक्कर असल्याचे त्याच्या पायाच्या ठशांवरून लक्षात येते. घटनास्थळ असलेल्या दाभडी जंगलात पंचनामा करण्यात आला आहे. मृताच्या नातेवाइकांना शासनाच्या नियमानुसार मदत देण्यात येईल.
- रूपेश रोलगे, वनपरिक्षेत्र अधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com