स्टंटबाजी करताना युवकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

नागपूर - रेसर बाइकवर स्टंटबाजी करताना नियंत्रण सुटून ट्रकला धडकल्याने अनिकेत हिरणवार (वय २०, रा. भोले पेट्रोलपंप, धरमपेठ) याचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास तेलंगखेडी मार्गावर घडला. कार्तिक रनावरे याच्यावर उपचार सुरू आहेत.

अनिकेत हिरणवार याच्यावर सीताबर्डी व अंबाझरी पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. तो स्टंटबाज असून, वेगात दुचाकी चालविण्यात तरबेज होता. यापूर्वीही त्याचा स्टंटबाजी करताना अपघात झाला होता. मात्र, त्यावेळी तो थोडक्‍यात बचावला होता. 

हितेश अनिल हुमने (वय २१, छापरूनगर), अनिकेत हिरणवार आणि कार्तिक ननावरे आणि पृथ्वी तोमर बुधवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास नूडल्स खान्यासाठी तेलंगखेडी मैदानावर गेले. तेथील ठेला बंद असल्यामुळे ते फुटाळा तलावाकडे निघाले. तेलंगखेडीतील महाराष्ट्र पशू व मत्स्य विद्यापीठासमोर अनिकेत रेसर बाइकने स्टंटबाजी करीत होता. स्टंटबाजी करताना अनिकेतचा तोल गेला आणि समोरून आलेल्या ट्रकवर आदळला. ट्रकखाली आल्याने अनिकेत चिरडल्या गेला, तर कार्तिक हा दुचाकीवरून फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झाला. अपघात झाल्यानंतर नागरिकांची गर्दी झाली. हितेशने पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल करून अपघाताची माहिती दिली. पोलिसांनी लगेच अपघातग्रस्त दोघांनाही मेयोत दाखल केले. अनिकेतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर कार्तिकवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी अपघातांची नोंद केली.

Web Title: youth death in accident