सेल्फीच्या नादात युवकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

चिमूर : नागपूर येथून मित्रांसोबत चिमूर येथील रामदेगी येथे पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा सेल्फी घेण्याच्या नादात तोल जाऊन डोहात पडल्याने मृत्यू झाला. शैलेश खेळकर वय 27 रा. मॉ भगवती नगर, हुडकेश्वर नागपूर असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. शैलेश हा खोल कुंडातील डोहात बुडाला. 

रामदेगी हे पवित्र हिंदु व बौद्ध धर्मीयांचे तिर्थस्थळ म्हणुन प्रसिद्ध आहे. तसेच वनसंपदाने नटलेल्या या स्थळाला अनेक भावीक, युवक युवती भेट देत असतात. नागपुर येथील युवक आपल्या मीत्रांन सोबत 7 ऑक्टोबरला सेल्फी काढत असताना तोल जाऊन डोहात पडला. मात्र त्याचा शोध तब्बल चोविस तासाने लागला.

रविवारच्या सुट्टीचा आंनद घेण्या करीता चारचाकी वाहनाने रामदेगीला काही तरूण आले होते. परीसरातील निसर्ग सौंदर्य पाहील्या नंतर निघायच्या सुमारास कुंडाचे सौंदर्य पाहून सेल्फी घेण्याचा मोह अनावर झाला. मात्र सेल्फीच्या नादात तोल जाऊन तो डोहात पडला. त्यांनतर त्याला वाचविण्याचा मित्रांनी प्रयत्न केला पंरतु वाचवु शकले नाही. शेगाव पोलिस स्टेशन येथे घटनेची माहीती देण्यात आली त्यानुसार त्याचा होडी द्वारे शोध घेण्यात आले. तब्बल २४ तासाच्या प्रयत्नानंतर शैलेश चा मृतदेह सापडला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth death while taking selfie