कंत्राटी विद्युत सेवकाचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू

file photo
file photo

चिमूर (चंद्रपूर) : वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी खांबावर चढलेल्या कंत्राटी विद्युतसेवकाचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. 23) दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. मृताचे नाव प्रकाश महादेव वाकडे (वय 25) असे आहे.
सध्या वादळवाऱ्याने शहरातील वीजपुरवठा खंडित होणे सुरू झाले आहे. नेताजी वॉर्डातील कडुकर यांचा घरील वीजपुरवठा शनिवार रात्रीपासून बंद होता. त्यानुसार कडुकर यांनी महावितरणकडे तक्रार केली. तक्रारीनुसार महावितरणचे लाइनमन राठोड व कंत्राटी विद्युत सेवक प्रकाश वाकडे दोघेही दुरुस्तीसाठी कडुकर यांचे घरी गेले. तेव्हा खांबावरून वीजपुरवठा खंडित झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे कंत्राटी विद्युत सेवक प्रकाश वाकडे हे खांबावर चढले. लाईनमन राठोड खाली होते. प्रकाश वाकडे खांबावर दुरस्तीचे काम करीत असतानच खांबाला लावलेला हुक निसटला. त्यामुळे वाकडे यांना वीजतारांचा स्पर्श झाला. ते खाली कोसळले. या घटनेनंतर राठोड पळून गेले. परिसरातील नागरिकांनी विद्युत सेवकाला उचलून उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. डॉक्‍टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
पोलिसांनी गुन्हा नोंद करून घटनास्थळाचा पंचनामा केला. जोपर्यंत मृताच्या कुटुंबीयाला आर्थिक मदत मिळत नाही. त्याच्या परिवारातील एकाला त्याच्या जागेवर घेत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नसल्याची भूमिका नातेवाइकांनी घेतली. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. काही वेळेने महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता संजय जळगावकर आले. त्यांनी मृताच्या कुटुंबीयांची समजूत काढली. तत्काळ वीस हजारांची मदत दिली. तीन लाख 8 हजार आर्थिक मदत दीड महिन्यांत देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. त्यामुळे तणाव निवळला. महावितरण कंपनीने दुरुस्तीचे कंत्राट डी. आर. इंजिनिअर या कंपनीकडे दिले आहे. या कंपनीत विद्युत सेवक म्हणून आठ दिवसांपूर्वीच प्रकाश वाकडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. कंपनीने सुरक्षा किट दिली नसल्याने हा अपघात झाला असल्याचा कुटुंबीयाचा आरोप आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com