शेततळ्यात बुडून युवकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

साकोली (जि. भंडारा) : तालुक्‍यातील एकोडी येथे शेततळ्यात पोहताना युवकाचा बुडून मृत्यू झाला. वासुदेव गोपाळा सोनटक्के (वय 42) असे मृताचे नाव आहे. एकोडी येथील वासुदेव शुक्रवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घराजवळ असलेल्या शेततळ्यात पोहायला गेला होता. परंतु, तळ्यातील पाण्याचा अंदाज नसल्याने तो खोल पाण्यात बुडाला. सोबत कोणीही नसल्याने त्याला मदत मिळाली नाही. त्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. गावकऱ्यांना दुपारी या घटनेची माहिती झाली. त्यानंतर साकोली पोलिसांना सूचना देण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यावर मृतदेह नातेवाइकांना सोपविण्यात आला.

साकोली (जि. भंडारा) : तालुक्‍यातील एकोडी येथे शेततळ्यात पोहताना युवकाचा बुडून मृत्यू झाला. वासुदेव गोपाळा सोनटक्के (वय 42) असे मृताचे नाव आहे. एकोडी येथील वासुदेव शुक्रवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घराजवळ असलेल्या शेततळ्यात पोहायला गेला होता. परंतु, तळ्यातील पाण्याचा अंदाज नसल्याने तो खोल पाण्यात बुडाला. सोबत कोणीही नसल्याने त्याला मदत मिळाली नाही. त्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. गावकऱ्यांना दुपारी या घटनेची माहिती झाली. त्यानंतर साकोली पोलिसांना सूचना देण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यावर मृतदेह नातेवाइकांना सोपविण्यात आला. साकोली पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth dies after drowning in field lake