पांगोली नदीत बुडून युवकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

गोंदिया : मित्राच्या वाढदिवसाची पार्टी केल्यानंतर अंघोळीसाठी नदीत उतरलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.17) सायंकाळी सहाच्या सुमारास खमारीजवळील पांगोली नदी येथे घडली. नितीन गजेंद्रसिंह जैवार (वय 22व, रा. फुलचूर) असे मृताचे नाव आहे.

फुलचूर येथील उमेश छगन पंजारे (वय 31) याचा वाढदिवस 10 ऑगस्ट रोजी होता. परंतु, काही कारणास्तव त्याने वाढदिवसाची पार्टी शनिवारी (ता. 17) देण्याचे ठरविले. ठरल्याप्रमाणे दुपारी 3 च्या सुमारास 10 ते 12 मित्र खमारी येथील पांगोली नदीकाठावर पार्टी करण्यासाठी गेले होते. पार्टी आटोपल्यानंतर नितीन जैवार याला अंघोळीचा मोह आवरता आला नाही अन्‌ तो पाण्यात उतरला. बराच वेळ होऊनही तो पाण्याबाहेर आला नाही. त्यामुळे उमेश पंजारेसह त्याच्या मित्रांनी शोध घेतला. परंतु, तो आढळला नाही. त्यामुळे या घटनेची माहिती उमेशने गोंदिया ग्रामीण पोलिसांना दिली. माहिती मिळताच ठाणेदार मनोहर दाभाडे यांच्या नेतृत्वात पोलिस कर्मचारी व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा शोध व बचाव पथकाने शोधकार्य अवलंबिले. सायंकाळी उशिरा त्याचा मृतदेह पथकाला मिळाला. या प्रकरणी गोंदिया ग्रमीण पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात रविवारी (ता.18) शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth dies after drowning in Pangoli river