तलावात बुडून दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

हिंगणा/गुमगाव - शंकरपूर परिसरात रॉयल गोंडवाना शाळेजवळ खासगी तलावात दुर्गादेवीच्या विसर्जनासाठी गेलेल्यांपैकी एक युवक मंगळवारी (ता. ११) बुडाला. बुडालेल्या युवकाला बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी पाण्यात उतरलेला दुसरा युवकही पाण्यात बुडाला. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये विनोद मात्रे (वय १९, बेलतरोडी, नागपूर), वैभव मिस्किन (२५) यांचा समावेश आहे.

मंगळवारी (ता. ११) या परिसरातील दुर्गादेवीचे विसर्जन सुरू होते. विसर्जनासाठी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास विनोद मात्रे हा पाण्यात उतरला व खोल पाण्यात बुडाला. याची माहिती हुडकेश्‍वर ठाण्यात देण्यात आली. लागूनच हिंगणा ठाण्याची हद्द असल्यामुळे बुधवारी सकाळी हिंगणा पोलिसांना घटनास्थळी मदतीस बोलाविण्यात आले. ‘सर्च ऑपरेशन’ सुरू झाले. मृतदेह शोधकामात परिसरातील वैभव मिस्किन, राजेंद्र गोवारकर, राजू शेंदूरकर, वसंता गहाणे या सराईत पोहणाऱ्या युवकांना बोलाविण्यात आले. तलावाजवळ हुडकेश्‍वर व हिंगणा पोलिस दल उपस्थित होते. दुपारी एक वाजताच्या सुमारास हे तरुण पाण्यात उतरले. मात्र, काही वेळातच वैभव हा खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचविण्यासाठी बचाव पथकाने प्रयत्न केले. मात्र, त्याला वाचविणे शक्‍य झाले नाही. पाणबुडे व अग्निशामक दल सायंकाळपर्यंत प्रयत्न करीत होते. मात्र, दोन्ही मृतदेह काढण्यात यश आले नव्हते.

Web Title: youth drawn in lake

टॅग्स