सेल्फीच्या नादात तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

सहस्रकुंड (जि. यवतमाळ) : सेल्फी काढण्याच्या नादात एका अठरा वर्षांच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. आठ) घडली. सौरभ राठोड (रा. वाळकी, ता. किनवट) असे मृताचे नाव आहे.

किनवट तालुक्‍यात प्रसिद्ध असलेल्या सहस्रकुंड धबधब्याजवळ पर्यटकांसाठी तयार करण्यात आलेल्या ग्रीन गार्डनमध्ये असलेल्या तलावात सौरभ राठोड हा मित्रांसोबत सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी गेला होता. सौरभ पर्यटकांसाठी शासनाकडून तयार केलेल्या धबधब्याशेजारी ग्रीन गार्डनमध्ये तलावाच्या काठावर थांबून सेल्फी काढत असताना तोल गेल्याने तो बुडाला. त्याला पोहता येत नसल्याने ही दुर्घटना घडली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. प्रशासनाकडून सहस्रकुंड परिसरात डेंजरझोनमध्ये पर्यटक गेला, तर सायरन वाजण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, तरीही हौशी पर्यटक नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth drowne in lake while taking selfy