यवतमाळ: कृष्णापूर येथे युवा शेतकऱ्याची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

प्रकाश रामजी निखाडे असे शेतकऱ्याचे नाव आहे. त्याची विदर्भ नदी तीरावर चार एकर शेती आहे. यावर्षी त्या चार एकरात त्याने कपाशीची लागवड केली होती. मात्र यावर्षी झालेल्या अति पावसामुळे विदर्भा नदीला आलेल्या पुरा मुळे त्या परिसरातील शेकडो एकर शेती पाण्याखाली जाऊन नुकसान झाले होते. त्यामध्ये प्रकाश याच्या शेतातील चार एकर शेतीतील पीकाचे नुकसान झाले. तसेच नवीन पीक कर्ज न मिळाल्याने तो आर्थिक विवंचनेत होता.

वणी (जि. यवतमाळ) : तालुक्यातील शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या कृष्णांपुर येथील 32 वर्षीय युवा शेतकऱ्याने रविवारी (ता.12) ऑगस्टला विष प्राशन करून आत्महत्या केली.

प्रकाश रामजी निखाडे असे शेतकऱ्याचे नाव आहे. त्याची विदर्भ नदी तीरावर चार एकर शेती आहे. यावर्षी त्या चार एकरात त्याने कपाशीची लागवड केली होती. मात्र यावर्षी झालेल्या अति पावसामुळे विदर्भा नदीला आलेल्या पुरा मुळे त्या परिसरातील शेकडो एकर शेती पाण्याखाली जाऊन नुकसान झाले होते. त्यामध्ये प्रकाश याच्या शेतातील चार एकर शेतीतील पीकाचे नुकसान झाले. तसेच नवीन पीक कर्ज न मिळाल्याने तो आर्थिक विवंचनेत होता.

आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास घरी असलेले विषारी द्रव प्राशन केले. त्याला लगेच वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याचे मागे आई, गर्भवती पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे.

Web Title: youth farmer suicide in Yavatmal