यवतमाळ कॉंग्रेस, राकॉंत युवकांची घुसमट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

यवतमाळ : विधानसभा निवडणुका तोंडावर असताना भाजप आणि शिवसेना युवकांना प्रमोट करीत आहेत, तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये युवक पदाधिकाऱ्यांची घुसमट होत असल्याने या पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचे अस्त्र उगारले आहे. ऐन निवडणुकीपूर्वी युवक पदाधिकारी नाराज होत असल्याने दोन्ही कॉंग्रेससमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

यवतमाळ : विधानसभा निवडणुका तोंडावर असताना भाजप आणि शिवसेना युवकांना प्रमोट करीत आहेत, तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये युवक पदाधिकाऱ्यांची घुसमट होत असल्याने या पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचे अस्त्र उगारले आहे. ऐन निवडणुकीपूर्वी युवक पदाधिकारी नाराज होत असल्याने दोन्ही कॉंग्रेससमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
विधानसभा निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला आहे. भाजपने सदस्य नोंदणीच्या माध्यमातून तर शिवसेनेने आदित्य ठाकरेंच्या यात्रेच्या माध्यमातून युवक जोडण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. एकीकडे सत्ताधारी युवकांना महत्त्व देत असतानाच दुसरीकडे विरोधी बाकावर असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये युवकांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. पदाधिकारी दखल घेत नसल्याचा आरोप करीत युवक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिले असतानाच आता राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा अस्त्र उगारले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती बुधवारी (ता.24) दुसऱ्यांदा विश्राम भवन येथे झाल्या. सहा विधानसभेसाठी दहा इच्छुकांनी मुलाखती दिल्या. मुलाखत कार्यक्रमाची माहिती न दिल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा अस्त्र उगारले आहे.
जिल्हा निरीक्षक तथा माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, संतोष कोरपे यांनी विश्राम भवनात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. या कार्यक्रमाबाबत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना कुठलीही माहिती दिली गेली नव्हती. मुलाखती असल्याबाबत जिल्हास्तरावरुन कोणतीही सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे पक्षात डावलले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. याबाबत पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधत नाराजी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth feels uncomfort in congress, National congress

टॅग्स