युवकाची नऊ लाखांनी फसवणूक

file photo
file photo

नागपूर : रेल्वे विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून उच्चशिक्षित सुशांत मोहनराव लोखंडे (रा. वैष्णवी मातानगर, पिपळा रोड) या तरुणाची तब्बल नऊ लाख 75 हजारांनी फसवणूक करण्यात आली. पती-पत्नी विहार रणजित रामटेके व उस्माविहार रामटेके, रा. कृष्णा रिजेन्सी, कमाल चौक या बंटी-बबलीवर तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सुशांत हा फेब्रुवारी 2017 मध्ये शिकवणीवर्गासाठी जात होता. तेथील शिक्षिकेने सुशांतची विहार व उस्मा यांच्यासोबत ओळख करून दिली. रेल्वेत मोठ्या पदावर नोकरीवर असल्याचे दोघांनी सुशांतला सांगितले व टीसीची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. सुशांत त्याला बळी पडला. त्याने वेळोवेळी दोघांना नऊ लाख 75 हजार रुपये दिले. पैसे घेतल्यानंतरही दोघांनी नोकरी लावून दिली नाही. तसेच पैसे देण्यास नकार दिला.
यानंतर सुशांतने तहसील पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सुशांतची आई शिक्षिका होती. आईच्या निवृत्तीनंतर मिळालेले पैसे सुशांतने बंटी-बबलीला दिले होते. बडे अधिकारी असल्याने नोकरी मिळेल, अशी आशा सुशांत व कुटुंबीयांना होती. मात्र, बंटी-बबलीने फसवणूक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com