ऑनलाइन व्यवहारातून युवकाची फसवणूक

file photo
file photo

टेकाडी (जि.नागपूर) : "ऑनलाइन बॅंकिंग' आणि वाढत्या "बॅंकिंग ऍप'चे तंत्रज्ञान सगळीकडे वाढत आहे. त्यातून ऑनलाइन फसवणुकीच्या घटनाही वाढत आहे. सायबर लुटारू वेगवगेळ्या माध्यमातून मोबाईल नेट बॅंकिंग वापरणाऱ्या युजर्सना निशाणा करीत आहेत. कन्हान पोलिस हद्दीत एका युवकाला "एनी डेस्क' नावाची रिमोट ऍप डाउनलोड करणे चांगलेच महागात पडले. त्याच्या खात्यामधील सतरा हजार रुपयांवर सायबर लुटारूंनी गंडा घातल्याची घटना उघडकीस आली.
फिर्यादी टेकाडी येथील रहिवासी राजकुमार मनोहर वझेकर या युवकाने "ऑनलाइन बॅंकिंग गुगल प्ले'या अप्लिकेशनद्वारे मित्राला पाच हजार रुपये पाठविले. परंतु, पैसे मित्राच्या अकाउंटला पोचले नसल्याने त्याने एसबीआय बॅंकेत यासंदर्भात तक्रार केली. बॅंकेकडून यावर आमच्याकडे समाधान नसून आपण "कस्टमर केयर' सोबत बोलून आपला तिढा सोडवावा, अशा सूचना दिल्या. यावर राजकुमार यांनी गुगल सर्च इंजिन वरील 7047601860 या टोलफ्री क्रमांकावर फोन केला. त्यावर पुढून त्याला मोबाईलमध्ये "एनीवे' नावाची मोबाईल ऍप डाउनलोड करायला सांगण्यात आले. ऍप्लिकेशन डाउनलोड करून बॅंक खात्याचा युपीआस आयडी मागितले. फिर्यादीने ती देताच युपीआय रजिस्टर्ड मोबाईल नंबर टेस करून अकाउंटबद्दल माहिती हॅक करून खात्यात असलेले सतरा हजार रुपये डेबिट झाल्याचा संदेश मोबाईलवर धडकला. त्यानंतर फोन कट झाला. परत त्या फोनवर संपर्क केला असता कुठलाही रिप्लाय येत नव्हता. राजकुमार यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ताबडतोब कन्हान पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून कन्हान पोलिसांनी स्वतःला बॅंक किंवा कंपनीचा एजंट म्हणून सांगणाऱ्या आणि कुठलेही ऍप डाउनलोड करण्यास सांगणाऱ्या सगळ्या फोन कॉल्सपासून सावध राहण्याचा इशारा दिला.
फसवणुकीपासून कसे वाचावे?
कुठल्याही वेबसाईट किंवा किंवा ऍपवर बॅंकिंग पासवर्ड किंवा "ओपीटी' टाकू नका. युपीआय नंबर, डेबिट-क्रेडिट कार्ड, सीसीव्ही, डेबिट कार्ड व्हॅलिडिटी, ओपीटी, एटीएम, अढच पिन, बॅंक अकाउंट नंबर ही माहिती कुणाला देऊ नका. कुठलेही थर्ड पार्टी ऍप डाउनलोड नका. बॅंक एजंट सांगून कुणी तुम्हाला एसएएस पाठवला तर कुठेही दुसऱ्या नंबरवर फॉरवर्ड करू नका. गुगलच्या भरोशावर कुठल्या बॅंक किंवा टेलिकॉम कंपनीचा नंबर शोधून त्यांना आपली माहिती देणे टाळावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com