नळावर लावलेल्या मोटारीने केला घात, विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू 

नळावर लावलेल्या मोटारीने केला घात, विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू 

तिष्टी बु. (जि. नागपूर) : नळावर लावलेल्या मोटारीचा वीजप्रवाह पाण्यात आल्याने धक्का लागून एका युवकाचा मृत्यू झाला. ही घटना कळमेश्‍वर तालुक्‍यातील तिष्टी (बु) येथे रविवारी दुपारी घडली. कल्पेश लीलाधर मोहितकर ( वय 22, रा. तिष्टी बुद्रुक) असे मृताचे नाव आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, मृत कल्पेश वडिलांसोबत शेती करतो. रविवारी तो शेतातील कामे आटोपून घरी आला होता. याच वेळी नळ आले होते. घरी नळावर मोटार बसविल्याने ती सुरू केली होती. या मोटारीचा वीजप्रवाह नळातून प्रवाहित झाल्याची माहिती नसल्याने अंघोळीसाठी गेल्यावर नळाला हात लावताच त्याला विजेचा जोरदार धक्का लागला व तो जागीच पडला. आसपास खेळणारी लहान मुले बाथरूममध्ये गेल्यावर कल्पेश पडून दिसल्याने ही घटना उघडकीस आली. आसपासचे लोक मदतीसाठी आले. मात्र, बराच वेळ वीजपुरवठा त्याच्या शरीरात प्रवाहित होत असल्याने त्याचा मृत्यू झाला होता. ही माहिती शेतात असलेल्या त्याच्या वडिलांना देण्यात आली. यानंतर केळवद पोलिसांना घटनेबाबत माहिती देण्यात आली. मृतदेहाला शवविच्छेदनासाठी सावनेर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. शवविच्छेदनानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घरातील कमावता गावातील तरुण मुलाचा अचानक मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com