आदिवासींच्या प्रश्‍नांसाठी युवक निघाले मुंबईला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

अमरावती : आदिवासींच्या विविध प्रश्‍नांवर पाच वर्षांपासून जिल्हा प्रशासनास संघटनेतर्फे निवेदने दिली जात आहेत, मात्र त्यावर कुठलीच कार्यवाही होत नसल्याचे सांगत ट्रायबल फोर्सचे चार कार्यकर्ते राज्यपालांना निवेदन देण्यासाठी ऑगस्ट क्रांतिदिनी आज, शुक्रवारी सायकलने मुंबईला रवाना झाले.

अर्जुन युवनाते, देवरस वरठी, राजू कलाने, सूरज मडावी अशी या युवकांची नावे असून ते ट्रायबल फोर्सचे कार्यकर्ते आहेत. आदिवासी समाजातील धनगर आरक्षण, डीबीटी योजना, आदिवासी विभाग तसेच बेरोजगारी व विविध सामाजिक प्रश्‍नांबाबत जिल्हा प्रशासनास वेळोवेळी निवेदने देण्यात आली. त्यावर कुठलीच कार्यवाही झालेली नाही. चिखलदरा तालुक्‍यात कोटमी ते बडगाम या मार्गावरील पुलाचे बांधकाम आठ महिन्यांपासून अर्धवट आहे. त्यावरून ये-जा करताना नागरिकांना जीव धोक्‍यात घालावा लागतो. त्याबाबतचे निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी मनीषा खत्री यांना देण्यासाठी कार्यकर्ते गेले असता त्यांना हाकलून लावण्यात आले, असे सांगत बिरसा क्रांती दलाने बुधवारी (ता. सात) मनीषा खत्री यांची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत थेट राज्यपालांकडे तक्रार केली होती. यातूनच कार्यकर्त्यांनी सायकलने मुंबईला जाण्याचा संकल्प केला. चारही युवक दुपारी 1 वाजता मुंबईकडे निघाले. दररोज 60 ते 70 किलोमीटरचा प्रवास करतील.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth leave for Mumbai for tribal questions