पैशाच्या वादातून तरुणाचा खून ; हुडकेश्‍वरातील घटना

अनिल कांबळे
रविवार, 6 मे 2018

अमोल आणि आरोपी लवंग उर्फ संदेश सुभाष पाटील (30) हे एकाच वस्तीत राहतात. अमोलचे घरीच कपड्‌यांना इस्त्री करण्याचे दुकान आहे. आरोपी लवंग उर्फ संदेशचे वडिलांचे किराणा दुकान आहे. लवंग काहीच कामधंदा करीत नव्हता. तीन चार महिन्यांपूर्वी लवंगने अमोलला 50 हजार रुपये उधार दिले होते. लवंगने पैसे परत मागितले.

नागपूर : उधारीच्या पैशांवरून झालेल्या भांडणात हुडकेश्वर मार्गावरील नागरे सभागृहामागे एका सिमेंटच्या बाकड्‌यावर झोपलेल्या तरुणाच्या डोक्‍यात दगडाने वार करून निर्घृण खून केला. ही घटना शनिवारी रात्री घटना घडली. अमोल गिरीधारी भेंडारकर (28) रा. दुबेनगर असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. 

अमोल आणि आरोपी लवंग उर्फ संदेश सुभाष पाटील (30) हे एकाच वस्तीत राहतात. अमोलचे घरीच कपड्‌यांना इस्त्री करण्याचे दुकान आहे. आरोपी लवंग उर्फ संदेशचे वडिलांचे किराणा दुकान आहे. लवंग काहीच कामधंदा करीत नव्हता. तीन चार महिन्यांपूर्वी लवंगने अमोलला 50 हजार रुपये उधार दिले होते. लवंगने पैसे परत मागितले.

दारू पिल्यानंतर तो नागरे सभागृहामागे असलेल्या शिवमंदिरातील सिमेंटच्या बाकड्‌यावर झोपत असे. पैशाच्या वादावरून शनिवारी रात्रीही त्यांच्यात कडाक्‍याचा वाद झाला होता. त्यानंतर अमोल शिव मंदिराकडे झोपायला गेला. रात्री दोनच्या सुमारास आरोपी लवंग हा घटनास्थळी गेला आणि झोपेत असलेल्या अमोलच्या डोक्‍यावर दगडाने मारून त्याचा खून केला.

Web Title: The youth Murder because of money case