जीपने केला पाठलाग अन्‌ मंगेशचा झाला गेम 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

मंगेशसोबत त्याचे नागपूर येथे राहणारे तीन मित्र सकाळी 8.45 वाजता पारशिवनी टी-पॉईंटवर होते. ते सकाळी वाळूघाटावरून परत आले होते. याचवेळी आरोपींनी त्यांना तेथे पाहिले व निघून गेले. दोन दुचाकी वाहनाने सर्व सुरादेवीकडे निघाले.

खापरखेडा (जि. नागपूर) : वाळूच्या अवैध उत्खननामध्ये हस्तक्षेप व जीवे मारण्याच्या जुन्या वादातून वारेगाव-सुरदेवी टी-पॉईंटवर आरोपींनी बदला घेण्यासाठी एकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना रविवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. मंगेश कवडू बागडे (वय 27, रा. साहोली, ह.मु. पारशिवनी) असे मृताचे नाव आहे. 
 

Image may contain: one or more people and selfie

मंगेशच्या दुचाकीला मागून धडक 
मंगेशसोबत त्याचे नागपूर येथे राहणारे तीन मित्र सकाळी 8.45 वाजता पारशिवनी टी-पॉईंटवर होते. ते सकाळी वाळूघाटावरून परत आले होते. याचवेळी आरोपींनी त्यांना तेथे पाहिले व निघून गेले. दोन दुचाकी वाहनाने सर्व सुरादेवीकडे निघाले. दरम्यान, आरोपींनी त्यांचा जीपने पाठलाग केला. मंगेश एकटाच त्याच्या दुचाकीवर होता. आरोपींनी मंगेशच्या दुचाकीला मागून धडक दिली. दुचाकीवरून मंगेश खाली पडला तर आरोपीची जीप रस्त्याच्या खाली उतरली व तिथेच अडकली. जीपमध्ये असलेले चार आरोपींनी मंगेशकडे धाव घेतली. जीव वाचविण्यासाठी मंगेशने सुरादेवीकडे धाव घेतली. यावेळी त्याच्या कंबरेला असलेली बनावट पिस्तूल तेथेच पडली. तर त्याच्या इतर साथीदारांनी घटनास्थळावरून पळ काढला.

 

Image may contain: outdoor
घटनास्थळावरील दगड व रक्त 

डोक्‍यावर केला दगडाने वार 
पळणाऱ्या मंगेशला आरोपींना पाठलाग करून सुरदेवी मार्गावर पकडले. त्याला मारहाण करीत असतानाच एकाने मोठा दगड मंगेशच्या डोक्‍यात घातला. यानंतर दगडाने अनेक वार करण्यात आले. यात घटनास्थळावरच मंगेशचा मृत्यू झाला. चौघेही आरोपी पसार झाले. या मार्गावरून जाणाऱ्या एका कारचालकाने नजीकच्या लोकांना एकत्र करून मंगेशला कामठीच्या आशा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. येथे डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. 

Image may contain: outdoor

मंगेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूरच्या मेयो इस्पितळात पाठविण्यात आला आहे. खापरखेडा पोलिसांनी या प्रकरणी आरोपी राजेश पेंदाने व सतीश ऊर्फ सचिन चव्हाण (दोघेही रा. नवीन भानेगाव) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. 

Image may contain: one or more people, motorcycle, shoes and outdoor

पोलिसांना घटनास्थळावरून मंगेशची दुचाकी, त्याची बनावट माऊजर, आरोपींची जीप जप्त करण्यात आली. जीपची तपासणी केल्यावर त्यातून लोडेड बनावट माऊजर आढळले. पोलिसांनी घटनास्थळावरील दगडासह इतर वस्तूही जप्त केल्या आहेत. यात एका आरोपीचा मोबाईलचा देखील समावेश आहे. 

जाणून घ्या - प्राणहिता नदीत नाव उलटून दोन प्रवाशांना जलसमाधी

चार महिन्यांपूर्वीच सुटला कारागृहातून 
मंगेशने दीड वर्षांपूर्वी रेती तस्करी करणाऱ्या राजेश पेंदाने याला कन्हान नदीपुलावर गोळी मारून खून करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात राजेश सुदैवाने बचावला. या प्रकरणी अटकेत असलेला मंगेश चार महिन्यापूर्वी कारागृहातून बाहेर आला होता. शिवाय त्याने रेती उत्खननात सक्रिय झाला. राजेश व मंगेश यांच्यात रेतीच्या अवैध उत्खननाचा वाद होताच शिवाय दोघांमध्ये हप्त्याचाही वाद असल्याची चर्चा आहे. 

पंधरा दिवसांपूर्वी झाले होते भांडण 
राजेश पेंदाने यांच्या सोबतचे इतर लोक मंगेशला हप्ता देण्यास तयार नव्हते. तर राजेशच्या डोक्‍यात आधीच जुना वाद सलत होता. दोघेही एकमेकांना जीवे मारण्याच्या प्रयत्नात होते. अवैध रेती उत्खननाचा धंद्यातील वसुलीच्या कारणाहून दोन्ही गटात पंधरा दिवसांपूर्वी भांडण झाले होते. मंगेशचा खून राजेश पेंदाने व त्याच्या साथीदारांनी केला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्या दिशेने तपास सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth murdered at khaparkheda