युवकाची ‘ऑनलाइन’ फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

टेकाडी - नामांकित कंपनीत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगार सिव्हिल इंजिनिअर युवकाला ऑनलाइन इंटरव्ह्यू घेऊन पैसे दडपल्याचे प्रकरण कन्हान पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आले. या प्रकरणात कन्हान पोलिस ठाण्यात फिर्याद घेण्यास नकार दिला.

कांद्री येथील सिव्हिल इंजिनिअर राहुल बागडे (वय २८) या युवकाने नोकरीसंदर्भात ‘नोकरी डॉट कॉम’ या वेबसाइडवर दोन महिन्यांपूर्वी सिव्ही अपलोड केलेला होता. बागडे यांच्या मोबाईलवर गुरुवारी(ता.११) सकाळी एक फोन आला. इंडिको एअरलाइन्स या नामांकित कंपनीत मुंबई येथे नोकरी देणार असल्याचे एकाने बागडे यांना पटवून दिले.

टेलिफोनीक इंटरव्यूह होणार असून रजिस्टेशन म्हणून १५०० रुपये कंपनीच्या अकाउंटमध्ये टाकण्यास सांगण्यात आले. बेरोजगार असलेल्या युवकाने मित्राकडून उसनवारीने पैसे घेऊन ‘गुगल पे’ च्या माध्यमातून बॅंकेच्या  खात्यात जमा केले. त्यानंतर बागडे यांना पुन्हा एक कॉल आला आणि टेलिफोनीक इटरव्यूह घ्यायला सुरुवात करण्यात आली. त्यात त्यांनी यश संपादित केल्याचे सांगण्यात आले. जॉब प्लेसमेंटसाठी कंपनीच्या खात्यात आता पंधरा हजार टाकण्यात सांगण्यात आले. 

परंतु, बागडे  यांना संशय आला आणि त्यांनी तुम्ही काम देताय की पैसे लुबाडताय, असा सवाल करताच समोरून तुमचे पैसे पहिल्या पगारात तुम्हाला परत करण्यात येईल, असे सांगितले. बागडे यांनी कामास नकार दिला आणि कॉल कट झाला. वारंवार फोन करूनदेखील नंबर ‘स्विच ऑफ’ येत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे बागडे यांच्या लक्षात आले. त्याविरुद्ध त्यांनी सोमवारी कन्हान पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth online fraud in nagpur