आदिवासी तरुणांनी केली नक्षल बॅनरची होळी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

गडचिरोली : नक्षल्यांनी फुकारलेल्या नक्षलसप्ताहाचा आदिवासी युवकांनी विरोधात केला असून त्यांनी नक्षल्यांच्या बॅनरची होळी करून निषेध नोंदविला. आजपासून नक्षल सप्ताहाला सुरूवात झाली आहे. नक्षल्यांनी ठिकठिकाणी बॅनर लावून सप्ताह पाळण्याचे आवाहन केले होते. याविरोधात आदिवासी युवक रस्त्यावर उतरले आहेत.
जारावंडी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील जारावंडी ते कासनसुर मार्गावर ताडगुडा फाट्याजवळ नक्षलवाद्यांनी नक्षल सप्ताह पाळण्याचे आवाहन करणारे बॅनर लावले होते. ताडगुडा व कसुरवाही येथील आदिवासी तरुणांनी एकत्र येत नक्षलवाद्यांनी लावलेले बॅनर काढून त्याची होळी केली.

यावेळी तरुणांनी नक्षलवादाविरोधात घोषणा दिल्या. त्याचबरोबर नक्षलवाद्यांनी सप्ताह पाळण्याच्या केलेल्या आवाहनाला विरोध असल्याचे तरुणांनी सांगितले. आदिवासींवर नक्षलवादी सप्ताहाच्या नावाखाली अत्याचार करत असल्याचा आरोप युवकांनी केला. हा प्रकार आदिवासी तरुण हे खपवून घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
गडचिरोली पोलिस दलाने पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून 28 जुलै ते 3 ऑगस्ट रोजी "आदिवासी विकास सप्ताह' साजरा करण्याचे घोषित केले आहे. यामध्ये तरुणांसाठी रोजगार मार्गदर्शन, युवकांची खेळाची आवड लक्षात घेऊन त्याबाबत पाठपुरावा, त्याचबरोबर आदिवासी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र काढून देण्यासाठी गडचिरोली पोलिस दल सर्वतोपरी मदत करणार आहे. नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या नक्षल सप्ताहाला न जुमानता अनेक आदिवासी तरुणांनी घराबाहेर पडून आपापल्या गावाच्या विकासासाठी एकत्र येऊन गडचिरोली पोलिस दल ठिकठिकाणी राबवीत असलेल्या "आदिवासी विकास सप्ताहात' सामील व्हावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth from remote area fired naxal banner