दिवाळीच्या पर्वावर चार गावातील तरूणांना प्रबोधनाची भेट 

Godpimpri
Godpimpri

गोंडपिपरी : दिवाळीत गावाकडे यायचे फटाके फोडायचे,नातेवाईकांची भेटभलाई घ्यायची,गोळधोळ खाउन पुन्हा आपले ध्येय गाठण्यासाठी पुणे मुंबईला परतायचे.असा त्यांचा नित्यक्रम.पण यंदाची दिवाळी चार गावांतील तरूणासाठी त्यांनी खासस ठरविली.बाहेरगावी शिकणा-या तरूणांनी त्यांना प्रबोधनाची भेट देत त्यांच्या दिवाळीत नवे प्रकाशपर्व भरविले.

सुरेश सातपुते, मनोहर रोहणकर, रामकृष्ण झाडे, लोमेश बोरकुटे, संजय इजमनकार, विनोद धांदरे, गुरूदेव भोयर गोंडपिपरी तालुक्यातील हे भुमीपुत्र... कुणी पुण्याला साप्टवेअर इंजिनीअर आहे तर कुणी दिल्लीत पोलीस सेवेत,नागपूर नाशिक मध्येही काही स्पर्धा परिक्षेची तयारी करताहेत.दिवाळीनिमीत्त न चुकता गावाकडे यायच अनं धुमधडाक्यात ती साजरी करावयाची.नातेवाईकांना शहरातून वस्तू आणायच्या अनं आंनद साजरा करावयाचा असा दरवषीचा क्रम.यंदा मात्र आगळीवेगळी दिवाळी साजरी करण्याचे त्यांनी नियोजन केले.आपल्या कुटुंबियासोबतच आपल्या गावातील तरूणांना दिवाळीची काही भेट देता येईल का ,यासाठी हि संपुर्ण मंडळीनी एकमेकांशी संपर्क केला.अन काही वेळातच नियोजन झाले.सोमनपल्ली,चेकसोमनपल्ली,कोंढाणा,येथील धिरज पाल,अनील ठाकूर,संजय कुबडे,सुरज देठे,संजय दुर्गे,निलेश भसारकर,समीर भुरकुंडे या तरूणांनी चर्चा करून सोमनपल्ली सल्तनत युवा मित्र मंडळाची स्थापना करण्यात आली.

अन भाउबीजेच्या दिवशी या आगळयावेगळया उपक्रमाचा प्रत्यक्ष साक्षात्कार झाला. सकाळी स्पर्धा परिक्षेत यशश्वी झालेल्या अनुप भोयर,सचिन लेडांगे,अभिषेक जंगमवार, नितेश गोहणे, पिंपळशेडे यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यांनतर स्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या पण कमकुवत आर्थीक स्थितीमुळे कुठे जाउ न शकणा-या चार गावातील सात तरूणांना भाउबीजेची भेट देण्यात आली.यात आर्थीक रक्कमेचाही समावेश होता.चार गावातील एकून 52 मुलांना विविध प्रकारचे शैक्षणीक सहित्याची भेट देण्यात आली.तर पोलीस भरतीची तयारी करणा-या दहा तरूणांना परिक्षेसाठी उपयुक्त ग्रंथभेट देण्यात आली.दिवाळी खर तर प्रकाशपर्व देणारा सण.अशा पंरपरेला फाटा देत भुमीपुत्रांनी आपल्या गावातील तरूणांना दिलेल्या दिवाळीच्या आगळयावेगळया भेटीची चांगलीच चर्चा सुरू आहे.महानगरात वास्तव्यास असूनदेखिल आपल्या मातीतल्या माणसांसाठी काहीतरी करण्याची त्यांच्या या भुमिकेबाबत कौतूक होत आहे.

भाउबीजेच्या पर्वावर गावातील भुमीपुत्रांकंडून मिळालेल्या प्रकाशरूपी भेटीने विद्यार्थी व तरूणांना नवी प्रेरणा मिळाली.आहे.गोंडपिपरी सारख्या मागासलेल्या तालुक्यातील तरूणांनी अशापध्दतीने साजरी केलेली दिवाळी समाजापुढे आदर्शवत असल्याच्या प्रतिकी्रया आता उमटत आहेत.या उपक्रमासाठी चारही गावातील तरूणांनी परिश्रम घेतले.

‘‘समाजासाठी काही देण आहे हि जाणीव आजही आमच्यात आहे.दरवर्षी कुटुंबासोबत दिवाळी साजरी करायचो.यावर्षीच्या दिवाळीत मात्र आम्ही परिवर्तनाचा प्रयोग केला. चार गावातील तरूणांना मदतीचा हात दिला.
- सुरेश सातपुते, अध्यक्ष, सोमनपल्ली सल्तनत युवा मित्र मंडळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com