कृषीमंत्री फुंडकरांच्या घरासमोर आत्मदहनाचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या घरासमोर आंदोलनाचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यांना तहसीलदारासमोर हजर करून बॉण्ड लिहून नंतर सोडण्यात आले. 
- संतोष ताले, ठाणेदार खामगाव 

खामगाव : कृषीमंत्री पांडुरंग फुंडकरांच्या घरासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या १५ बियाणे उत्पादक प्रतिनिधींना आज (ता.३०) पोलिसांनी घेतले. वाशीम येथील बियाणे उत्पादक प्रतिनिधींच्या सामुहिक आत्मदहनाच्या इशार्‍याच्या पार्श्वभूमीवर फुंडकर यांच्या खामगाव येथील बंगल्यावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. फुंडकर यांच्या बंगल्याकडे जाणार्‍या प्रत्येक रस्त्यावर बॅरिकेटस लावण्यात आले असून अनेकांची ये-जा करतांना चौकशी करण्यात आली. 

मुख्यमंत्री, कृषीमंत्र्यांच्या सूचनेनुसार कृषी विभागाने २९  मार्च रोजी वाशिम येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात बियाणे उत्पादक प्रतिनिधींची बैठक घेतली. मात्र, या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने ३१  मार्च रोजी आत्मदहन करण्याचा निर्णयावर प्रतिनिधी ठाम होते. दरम्यान, ३०  मार्च रोजी कृषी विभागाने पुन्हा एकदा प्रतिनिधींची बैठक बोलाविली होती. यावर तोडगा न निघाल्याने बियाणे उत्पादक प्रतिनिधींनी आज शनिवारी फुंडकर यांच्या बंगल्यावर आत्मदहनाचा इशारा दिला होता.   

अनुदान मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींसह कृषी विभागाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात आला. अनुदान मिळाले नसल्याने अखेर आज दुपारी 2 ते 3 वाजेदरम्यान उत्पादक गट व कंपनीच्या प्रतिनिंधींनी राज्याचे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या येथील वसुंधरा स्थित निवासस्थानाजवळ आत्मदहन करण्यासाठी मोर्चा वळविला. मात्र तेथे तैनात असलेल्या उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदिप पाटील, ठाणेदार संतोष ताले यांनी वेळीच सदर प्रतिनिंधींना ताब्यात घेतले. असे एकूण टप्याटप्याने १५  प्रतिनिधींना ताब्यात घेवून स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले होते.  फुंडकर यांच्या बंगल्यासमोर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. 

कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या घरासमोर आंदोलनाचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यांना तहसीलदारासमोर हजर करून बॉण्ड लिहून नंतर सोडण्यात आले. 
- संतोष ताले, ठाणेदार खामगाव 

Web Title: youth suicide attempt on Bhausahaeb Fundkar home