esakal | प्रेयसीच्या ब्लॅकमेलिंगला अखेर कंटाळला अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

suside.jpg

प्रेयसी आणि तिच्या नातेवाइकांकडून ब्लॅकमेलिंग केल्या जात असल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब बुलढाण्यात मंगळवारी समोर आली. 

प्रेयसीच्या ब्लॅकमेलिंगला अखेर कंटाळला अन्...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बुलढाणा ः प्रेयसी आणि तिच्या नातेवाइकांकडून ब्लॅकमेलिंग केल्या जात असल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब बुलढाण्यात मंगळवारी समोर आली. याप्रकरणी प्रेयसी आणि तिला मदत करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, विष्णू श्रावण जाधव 38 असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून, ते बुलढाणा येथील सुवर्ण नगर येथे राहत होते. ते चटई बनवण्याचे काम करत हाेते. जाधव यांना बुदाणा येथील जुनी ओळख असलेली प्रेयसी लग्नासाठी गळ घालून आपल्या साथीदारांसह ब्लॅकमेल करू लागली. यामुळे जाधव याने आत्महत्या केली.

दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी जाधव यांनी प्रेयसी सोबत झालेले संवाद व होत असलेली ब्लॅकमेलिंग बाबत पुरावे ऑडिओ क्लिपच्या रूपाने आपल्या मुलीला देऊन जाधव हे आत्महत्या करण्यासाठी गेले होते.

या बाबत मंगळवारी शहर पोलिस स्टेशनमध्ये प्रेयसीसह आणखी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रियसीला अटक करण्यात आली आहे. विद्या उमाकांत दांदडे असे प्रेयसीचे नाव असून सतीश राजपूत, अरुण सुसर, विशाल सूर्यवंशी आणि वंदनाबाई भोंडे या सर्वांनी मिळून विष्णू जाधव यांना मागील काही दिवसांपासून ब्लॅकमेल करीत होते. प्रेयसी विद्याला न्यायालयासमोर हजर केले असता ५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

loading image
go to top