फेसबुकवरील मैत्रीचा तिढा : ती म्हणाली लग्न करायचे नाही, तुला सोडते; तो म्हणाला विष घेईल, वाचा सविस्तर

संतोष ताकपिरे
Tuesday, 1 September 2020

तिचा मोबाईल नंबर मिळवून फेसबुक फ्रेण्ड्‌स झाल्यानंतर त्याने तिच्याशी संपर्क सुरूच ठेवला. काही दिवसांपूर्वी मोहनने अचानक नुकतीच मैत्री झालेल्या अल्पवयीन युवतीपुढे आधी प्रेमाचा आणि लगेच लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला.

अमरावती : तो एकोनीस वर्षांचा... ती सोळा वर्षांची... फेसबुकवरून त्यांची ओळख झाली... ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले... नंतर त्यांची चॅटिंग सुरू झाली... काही दिवसांनी त्याने तिच्यापुढे प्रेमाचा प्रस्ताव ठेवला... एवढ्या कमी वयात लग्नाचा प्रस्ताव ठेवल्याने ती चकीत झाली... मात्र, तिने ‘मी तुला सोडते’ या शब्दात स्पष्ट नकार दिला. संतापल्याने त्याने...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मंगरूळदस्तगीर ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन युवतीची (वय १६) फेसबुक अकाउंटवरून मोहन बाबूराव सोळंके (वय १९, रा. लोनगाव, जि. बीड) येथील युवकासोबत ओळख झाली.

जाणून घ्या - (Video) मस्तच... बोलीभाषेतून शिकविण्याची कला सातासमुद्रापार; लोटपोट होऊन विद्यार्थी करतात ज्ञानार्जन

तिचा मोबाईल नंबर मिळवून फेसबुक फ्रेण्ड्‌स झाल्यानंतर त्याने तिच्याशी संपर्क सुरूच ठेवला. काही दिवसांपूर्वी मोहनने अचानक नुकतीच मैत्री झालेल्या अल्पवयीन युवतीपुढे आधी प्रेमाचा आणि लगेच लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला.

युवतीला भेटण्यासाठी त्याने तगादा लावला. त्यानंतर आपला सोशल मीडियावर झालेला मित्र जरा वेगळ्या मार्गाने जात असल्याचे बघून तिने त्याला ‘मी तुला सोडते’ अशा शब्दात सुनावले. त्यावर त्याने प्रतिउत्तर देताना ‘तू सोडले तर, विषारी औषध घेऊन आत्महत्या करेल’, अशी तिला धमकी दिली. घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या अल्पवयीन युवतीने मंगरूळदस्तगीर ठाण्यात तक्रार नोंदविली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित मोहन सोळंकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वाचा - सावधान! सर्वात मोठ्या धरणाचे 33 दरवाजे उघडले.. इतिहासातील सर्वात मोठा पाण्याचा विसर्ग; जिल्ह्यात पुराचा धोका वाढला

पोलिसांनी केले गुन्हे दाखल

अल्पवयीन युवतीच्या प्रेमात पार वेडा झालेल्या युवकाने तिच्या नकारानंतर प्रयत्न सुरूच ठेवले. तू सोडत असशील तर ‘मी विष घेऊन आत्महत्या करेल’, असा पवित्रा त्याने घेतला. संशयित आरोपी मोहनविरुद्ध मंगरूळदस्तगीर पोलिसांनी विनयभंगासह स्वत:ही आत्महत्या करण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

अवश्य वाचा - वेसण तोडून बैल आला घरी आणि बळीराजाने गोठ्याकडे घेतली धाव..नक्की काय घडले?

व्यक्तिगत माहिती देण्याचे टाळा
कमी वयात सोशल मीडियाचा वापर शक्‍यतोवर टाळायला हवा. अनोळखी व्यक्तीला फेसबुक फ्रेण्ड करताना आपली व्यक्तिगत माहिती देण्याचे टाळावे. पीडित युवती कथित मोहन सोळंके याला कधी भेटली नाही. त्यामुळे तांत्रिक तपासाच्या आधारे या युवकापर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न राहील.
- श्‍याम वानखडे,
पोलिस निरीक्षक, मंगरूळदस्तगीर ठाणे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The youth threatened to commit suicide by refusing to marry