आठवडी बाजारातून मिळाला युवकांना रोजगार

अनिल दंदी
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

रिधोरा येथील आठवडी बाजारात विक्री होणाऱ्या भाजीपाला, ईतर वस्तूंच्या माध्यमातून गावातील शेतकरी व युवकांना उदरनिर्वाहाचे साधन मिळाले आहे. येथील आठवडी बाजारात लाखों रुपयांची उलाढाल होत आहे.
 

बाळापूर (अकोला)- तालुक्यातील रिधोरा येथील आठवडी बाजारात विक्री होणाऱ्या भाजीपाला, ईतर वस्तूंच्या माध्यमातून गावातील शेतकरी व युवकांना उदरनिर्वाहाचे साधन मिळाले आहे. येथील आठवडी बाजारात लाखों रुपयांची उलाढाल होत आहे.

अकोला जिल्ह्यातील व्यापारी रिधोरा येथील आठवडी बाजारासाठी माल घेऊन येतात. त्यामुळे ग्राहकांना ताज्या पालेभाज्या व फळभाज्या स्वस्त दरात मिळतात व गावातील आठवडी बाजारामुळे येथील अनेक युवकांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे. आठवडी बाजाराचा दुसराच हप्ता असुन दुसऱ्या सोमवारी बाजारात खरेदी विक्रीतून दोन लाख रुपयांची उलाढाल झाली. यातून वाहनचालक, हॉटेल, हमाल अशा विविध घटकांना रोजगार मिळत आहे.

परीसरात भाजीपाला लागवड करणारे अनेक शेतकरी आहेत. गावाची लोकसंख्या सुमारे दहा हजारांच्या आसपास आहे. दधम, बारलिंगा या गावातील नागरिक देखील संपर्कात आहेत. रिधोरा येथे मुख्य रस्त्याच्या बाजूला हा बाजार भरतो. या ठिकाणी तात्पुरते 100 हून अधिक विक्रेत्यांची दुकाने असून विक्री व्यवसायातून एक हजारापासून पंधरा हजार रुपये पर्यंतचा आठवडी बाजारात व्यवसाय होतो.

सध्या बाजारात पाच ते दहा रुपये किलो प्रमाणे टोमॅटो विक्री होत असल्याने ग्राहक खुष आहेत. यासाठी ग्रामपंचायत सरपंच शिल्पा कवळकार, उपसरपंच विनोद शिरसाट, पोलिस पाटील सुजय देशमुख, माजी उपसरपंच अनिल दंदी, धर्मेद्र दंदी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मधुकर देशमुख, मंगेश गवई, संजय अघडते, अनंत कवळकार यांचे सहकार्य मिळत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youths get employment from the weekend market