पैशाच्या देवाण घेवाणीच्या वादातून युवकाचा खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 जानेवारी 2019

पैशाच्या देवाण घेवाणीवरून झालेल्या वादातून तरूणाचा खून झाल्याची घटना घडली आहे. निलेश दिंडोकार याने अतुल नरेश धनोकार याला लोटपाट केली व चाकूने भोसकले. त्याचा अकोला येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना 13 जानेवारी सायंकाळी 5.30वा स्थानिक जुने महादेव मंदिराजवळ घडली.

शेगाव- पैशाच्या देवाण घेवाणीवरून झालेल्या वादातून तरूणाचा खून झाल्याची घटना घडली आहे. निलेश दिंडोकार याने अतुल नरेश धनोकार याला लोटपाट केली व चाकूने भोसकले. त्याचा अकोला येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना 13 जानेवारी सायंकाळी 5.30वा स्थानिक जुने महादेव मंदिराजवळ घडली.

शहरातील अतुल नरेश धनोकार वय 25 वर्षे रा. सावता चौक माळीपुरा शेगाव यांचेशी पैसे व मोबाईलच्या देवाण घेवाणीवरून निलेश दिंडोकार रा.शेगाव यांचा वाद झाला यामध्ये एकमेकांना शाब्दिक चकमक व लोटपाट करण्यात आली.

दरम्यान निलेश दिंडोकार या युवकाने अतुलच्या  छातीवर चाकूने वार केला यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने अकोला येथे उपचारासाठी नेण्यात आले. उपचार सुरू असतांनाच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शहरचे  ठाणेदार सुनील हुड व एसडीपीओ प्रदिप पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. सदरप्रकरणी राहुल धनोकार यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Youths Murder through Money dispute