जिल्हा परिषदेच्या शाळेतील बत्तीस विद्यार्थ्यांचा रेकार्डब्रेक निकाल

संदीप रायपुरे
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

मराठी शाळेतील विद्यार्थी कमी नाहीत याचा प्रत्यय गोंडपिपरी तालूक्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेने दिला आहे. नुकत्याच लागलेल्या स्कालरशिप परिक्षेचा निकालात या शाळेतील तब्बल बत्तीस विद्यार्थ्यांनी बाजी मारीत रेकार्डब्रेक निकाल दिला.

गोंडपिपरी (चंद्रपूर)-  मराठी शाळेतील विद्यार्थी कमी नाहीत याचा प्रत्यय गोंडपिपरी तालूक्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेने दिला आहे. नुकत्याच लागलेल्या स्कालरशिप परिक्षेचा निकालात या शाळेतील तब्बल बत्तीस विद्यार्थ्यांनी बाजी मारीत रेकार्डब्रेक निकाल दिला.

गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आपल्या नाविण्यपुर्ण उपक्रमासाठी ओळखली जाते. प्रयोगशिल व सामाजिक जाणिवा जोपासून येथील शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या शाळेला सजवले आहे. यामुळेच परिसरातील दहा बारा गावातील विद्यार्थी या शाळेला पसंती देत आहेत. मागील दिवसात कान्व्हैंटच्या अनेक विद्यार्थी या शाळेत प्रवेश घेतला. अशात शाळेची आभिमानाने मान, उंचाविणारी गुड न्यूज आली अन साऱ्यांचाच आनंद गगनात मावेनासा झाला.

इयत्ता पाचवीच्या विद्यार्थासाठी शिष्यवृत्ती परिक्षा घेतली जाते. यातून विद्यार्थ्यांना त्यांची गुणवत्ता सिध्द करण्यासोबतच शिष्यवृत्तीच्या रूपात आर्थिक मदत दिली जाते.
भंगाराम तळोधी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 39 विद्यार्थी या परिक्षेला बसले होते. काल उशिरा परिक्षेचा निकाल जाहिर झाला यामध्ये शाळेतील बत्तीस विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. अंकीता अशोक कोवे ही विद्यार्थीनी राष्ट्रीय गुणवत्ता यादीत स्थान पटकावून ग्रामीण भागातील गुणवत्तेची चुणूक दाखविली.

शाळेतील विद्यार्थ्यांना मिळालेल्या या रेकार्डब्रेक निकालामुळे सारेच अचंबीत राहिले.
शाळेचे पाचवीचे वर्गशिक्षक अरूण झगडकर,रत्नाकर चौधरी यांनी या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी मेहनत घेतली. एवढेच नव्हे तर त्यांनी या विद्यार्थ्यांच्या विशेष क्लास घेतला. शिष्यवृत्ती परिक्षेत विशैषत शाळेतून दोनचार विद्यार्थी उत्तीर्ण होतात. पण भंगाराम तळोधीत बत्तीस विद्यार्थ्यांनी यशाचा रेकार्ड करित मराठी शाळेतील मुले कमी नाही हे दाखवून दिले आहे.

यानिमित्त आज यशश्वी विद्यार्थ्यांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी सुनिल रामगोनवार अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती प्रमुख अतिथी मारोती अम्मावार उपसरपंच भंगाराम तळोधी प्रमुख मार्गदर्शक सुनिल मुत्यालवार केंद्रप्रमुख, सुनिता निलावार सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन साधना उराडे तर आभार अरूण झगडकर यांनी मानले.

भंगाराम तळोधी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या रेकार्डब्रेक रिझल्ट गावाची मान उंचावणारा ठारला आहे.आम्हाला त्यांचा आभिमान आहे.झगडकर,चौधरी या शिक्षकांचे योगदान महत्वाचे राहिले- मारोती अम्मावार उपसरपंच, भंगाराम तळोधी

Web Title: z p school record break result in chandrapur district