जिल्हा परिषद शाळेची इमारत धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

कोंढाळी - बाजार चौकातील जिल्हा परिषद शाळेची जुनी जीर्ण इमारत कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्‍यता आहे. जीर्ण इमारत पाडण्याची विनंती दहा वर्षांपासून होत असताना जिल्हा परिषद प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. 

कोंढाळी - बाजार चौकातील जिल्हा परिषद शाळेची जुनी जीर्ण इमारत कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्‍यता आहे. जीर्ण इमारत पाडण्याची विनंती दहा वर्षांपासून होत असताना जिल्हा परिषद प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. 

१९७० साली ही इमारत बांधण्यात आली. पटसंख्या वाढल्याने वर्गखोल्या वाढल्या. आज शाळेत ३०० विद्यार्थी आहेत. नव्या इमारती तयार झाल्याने वर्गखोल्या  हलविण्यात आल्या. पाण्याची व्यवस्था जुन्या इमारतीतच असल्याने विद्यार्थी पाणी पिण्यासाठी जातात. तर लागूनच अंगणवाडी असल्याने चिमुकल्यांसाठी धोकादायक ठरू शकते. जीर्ण इमारत पाडण्यासाठी २००९ साली ग्रामपंचायतीच्या ठरावासह जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागास पत्र पाठविण्यात आले. २०१० साली शाळा पाडण्यास तोंडी मंजुरी देण्यात आली. यानंतर वारंवार पत्र व्यवहार करण्यात आला आहे. 

मुख्याध्यापक म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारून पत्र व्यवहार केला जात आहे. मात्र, कुठलाही प्रतिसाद मिळत नाही.
- मनोज जयस्वाल, प्रभारी,  मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा कोंढाळी

शाळेची इमारत पाडण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला माहिती दिली. अद्याप कारवाई झाली नाही. हा अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा आहे. 
- रामदास मरकाम, जिल्हा परिषद सदस्य, कोंढाळी 

चांगले व मोफत शिक्षण मिळते म्हणून मुलाचे नाव जिल्हा परिषद शाळेत दाखल केले. मात्र येथे जर मुलाच्या जीव धोक्‍यात येत असेल तर अशा शाळेत पाठवून काय फायदा.
- निर्मला मोटघरे, पालक  

Web Title: Zilla Parishad school building is dangerous