जिल्हा परिषद लघुसिंचन तलाव "हाउसफुल्ल'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

हिंगणा (जि.नागपूर) : पावसाळ्यात वरुणराजाने उशिरा हजेरी लावली. यामुळे जलसंकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, उशिरा बरसलेल्या पावसाने जिल्हा परिषद लघुसिंचन तलाव "हाउसफुल्ल' झाले आहेत. तालुक्‍यात 844.50 मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. सद्यस्थितीत तलावात समाधानकारक जलसाठा आहे.

हिंगणा (जि.नागपूर) : पावसाळ्यात वरुणराजाने उशिरा हजेरी लावली. यामुळे जलसंकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, उशिरा बरसलेल्या पावसाने जिल्हा परिषद लघुसिंचन तलाव "हाउसफुल्ल' झाले आहेत. तालुक्‍यात 844.50 मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. सद्यस्थितीत तलावात समाधानकारक जलसाठा आहे.
मागील तीन वर्षांपासून हिंगणा तालुक्‍यात पर्जन्यमान सरासरी पेक्षाही निम्मे झाले होते. यामुळे उपलब्ध पाण्याच्या स्रोतांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला नव्हता. यावर्षीच्या पावसाळ्यात तब्बल महिनाभराने पावसाने हजेरी लावली. पाऊस पडणार की नाही, यामुळे शेतकरी चिंतातुर झाला होता. यानंतर पावसाने जोर पकडला. परिणामी तलावाची पाण्याची पातळी वाढली आहे. जिल्हा परिषद लघुसिंचन तलावामध्ये येरणगाव, वलनी, चिचोली, उमरी, मांडवा (1), मांडवा (2), धोकर्डा, दाभा, डेगमा खुर्द, कोकडी, कालडोंगरी, खातमारी, सातनवरी (1),सातनवरी (2), सातनवरी (3) सातनवरी(4) या तलावांमध्ये 100 टक्‍के जलसाठा उपलब्ध झाला आहे. पाटबंधारे विभागाअंतर्गत येणारे कान्होलीबारा, बीड बोरगाव तलावही भरले आहेत. तालुक्‍यात एकूण 25 सप्टेंबरपर्यंत 5067.02 मिमी पाऊस पडला असून सरासरी 844.50 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पाऊस समाधानकारक झाल्याने शेतकरी वर्गही सुखावला आहे.
तलावावरील चौकीदार "नॉट रिचेबल'
जिल्हा परिषद लघुसिंचन उपविभाग हिंगणा अंतर्गत 18 लघुसिंचन तलाव आहेत. त्याची देखभाल करण्यासाठी 13 चौकीदार नेमले आहेत. यातील दोन चौकीदाराची नेमणूक यांत्रिक विभागात करण्यात आली आहे. आता नुकतीच एका चौकीदाराची नियुक्ती सेवा संलग्नच्या नावाखाली जिल्हा परिषदेत करण्यात आली आहे. यामुळे काही तलावावर चौकीदार नाही.

जिल्हा परिषद लघुसिंचन उपविभाग हिंगणा येथील चौकीदार यांच्या बदल्या इतरत्र करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती आपल्याला नाही. तलावावरील सुरक्षा महत्त्वाची असल्याने चौकीदारांच्या बदल्या इतर विभागात करणे योग्य नाही. याबाबतची चौकशी करण्यात येईल. तलावाच्या सुरक्षेला प्राधान्य दिल्या जाईल.
कमलकिशोर फुटाणे
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zilla Parishad Small Irrigation Pond "Housefull"