पहिल्याच दिवशी मिळणार पुस्तके

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

नागपूर - नवे शैक्षणिक वर्ष मंगळवार (ता.२६) पासून सुरू होणार आहे. यंदा  पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात सर्व विषयांची मोफत पाठ्यपुस्तके देण्यात बालभारतीला यश आले आहे. नागपूर विभागात भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा व नागपूर  जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळांना सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत पहिली ते आठवीची एकूण ५२ लाख ६३ हजार २१४ पुस्तकांचे वाटप शाळांना बालभारतीने केले आहे. 

शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंददायी असावा, यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासात पुस्तकांअभावी अडचण होऊ नये, या उद्देशाने पहिल्याच दिवशी पुस्तके वाटप करण्याला प्राधान्य दिले जाते. सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा, यासाठी गेल्या महिन्यात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ, बालभारती नागपूर यांच्या अखत्यारित येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून विद्यार्थी संख्या मागविण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत १०० टक्के पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला असून शाळेच्या पहिल्याच दिवशी ही पुस्तके विद्यार्थ्यांच्या  हाती पडतील. अशी माहिती बालभारतीचे भांडार व्यवस्थापक व्ही. एल. पडघान यांनी दिली.

२४ लाख पुस्तकांची खुली विक्री
दरवर्षी पुस्तक वाटपामध्ये होणारा गोंधळ बघता बालभारतीने तालुका पातळीपर्यंत पुस्तक पोहोचविण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे तालुका पातळीवरून गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ती शाळेत मुलांपर्यंत पोहोचतील. इयत्ता दहावीची पुस्तके एप्रिल महिन्यातच बालभारतीतर्फे विक्रेत्यांना उपलब्ध करून देण्यात आली होती. खुल्या विक्रीमध्ये १५ टक्के सवलतीसह पहिली ते बारावीपर्यंतची सुमारे २४ लाख ५० हजार पुस्तके बालभारतीतर्फे पुस्तक विक्रेत्यांना वितरित केली आहे.

Web Title: ZP and Municipal School Books