जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प आज 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

नागपूर - जिल्हा परिषदेचा 2017-18 वर्षाचा अर्थसंकल्प उद्या मंगळवारला अर्थ समितीचे सभापती उकेश चव्हाण सादर करतील. मागील वर्षांचा खर्चित व अखर्चित निधी लक्षात घेता हा अर्थसंकल्प 40 कोटींवर जाण्याची शक्‍यता आहे. त्याप्रत्यक्षात कोणतीही वाढ नसलेला अर्थसंकल्प राहणार आहे. 

जिल्हा परिषदेने स्वत:च्या उत्पन्नातून जिल्ह्याचा समतोल विकास करावयाचा असतो. अर्थसंकल्प मांडताना जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आणि विभागीय जमेपासून प्रचलित दराने मागील तीन वर्षांतील प्रत्यक्षात प्राप्त झालेली जमेची सरासरी रक्कम यांचा अंदाज घेऊन अर्थसंकल्प मांडला जातो. जिल्हा परिषदेच्या होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन विकासात्मक अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा असणार आहे. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण, शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन, समाजकल्याण, पाणीपुरवठा विभागाचा बराच निधी अखर्चित आहे. शासनाने वैयक्तिक लाभाच्या योजनेचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात टाकण्याचे निर्देश दिले. त्यामुळे हा निधी अखर्चित राहिला आहे. हा सर्व अखर्चित निधी धरून यंदाचे बजेट 40 कोटींच्या जवळपास जाण्याची शक्‍यता आहे. 

यावर्षी 2016 -17 चा अर्थसंकल्प 36 कोटींच्या घरात होता. या अर्थसंकल्पातील निम्माच निधी खर्च झालेला आहे. हा अखर्चित निधी धरून यंदा 40 कोटींच्यावर अर्थसंकल्प जाण्याची शक्‍यता आहे. अर्थसंकल्पात समाजकल्याण, पाणीपुरवठा विभागाला 20 टक्के, महिला व बालकल्याण विभागास 10 टक्के, अपंग कल्याणाकरिता 3 टक्के असे एकूण 53 टक्के राखीव निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आल्याची माहिती आहे. 

Web Title: ZP budget today