अमरावती, यवतमाळ जि. प.च्या समित्यांच्‍या सभापतींची निवड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

नागपूर - अमरावती आणि यवतमाळ जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींची निवड प्रक्रिया आज, सोमवारी पार पडली. यात अमरावती जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या वाट्याला दोन तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय प्रत्येकी एक सभापतिपद मिळाले. यवतमाळ जि. प. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक आणि एका अपक्ष उमेदवाराची सभापतिपदी निवड झाली.  

अमरावती जिल्हा परिषद विषय समिती सभापतींच्या आज झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस आघाडीचा बोलबाला राहिला. सर्वच्या सर्व चारही सभापतिपदे जिंकून सत्ताधारी आघाडीची जि.प.वर निर्विवाद सत्ता स्थापन झाली. यानुसार समाजकल्याण समिती सभापतिपदी राष्ट्रवादीच्या सुशीला राजाभाऊ कुकडे, महिला बालकल्याण सभापतिपदी काँग्रेसच्या वनिता पाल, तसेच अन्य दोन विषय समिती सभापतींकरिता काँग्रेसचे जयंत देशमुख व आरपीआयचे बळवंत वानखडे विजयी झाले. या दोन्ही सभापतींना विशेष सभेत खातेवाटप करण्यात येईल.

विजयी झालेल्या काँग्रेस, सेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना प्रत्येकी ३३; तर विरोधी भाजप उमेदवारांना २६ मतांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेला उपाध्यक्षपद देण्यात आल्याने एकही सभापतिपद मिळाले नाही. विशेष म्हणजे, काँग्रेस आघाडीत एका अपक्षाची भर पडली.

यवतमाळ जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडप्रक्रियेनंतर आज, सोमवारी महिला व बालकल्याण, समाजकल्याण व विशेष समितीकरिता सभापतींची निवड प्रक्रिया पूर्ण झाली. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपसह अपक्ष उमेदवारांना ४१ मते मिळाली. 

त्यांची सभापतिपदी व विशेष समितीपदी निवड करण्यात आली. त्यात समाजकल्याण समितीच्या सभापतिपदी भाजपच्या प्रज्ञा भूमकाळे, महिला व बालकल्याण सभापती काँग्रेसच्या अरुणा खंडाळकर, बांधकाम व अर्थ समितीकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे निमिष मानकर व अपक्ष उमेदवार नंदिनी दरणे यांची आरोग्य व शिक्षण सभापतिपदासाठी निवड झाली आहे.

Web Title: zp chairman selection