ग्रामपंचायतीतील पराभव लागला जिव्हारी, जिल्हा परिषद सदस्यांसह समर्थकांचा राडा

सूरज पाटील
Wednesday, 20 January 2021

ग्रामपंचायत निवडणुकीत प्रीतेश दिनेश जयस्वाल (वय 31, रा. छोटी गुजरी) याची आई विजयी झाली. त्यामुळे मित्रांसह प्रितेशने त्याच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष केला.

यवतमाळ : डोर्ली येथील ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे उमदेवारांनी स्वत:च्या कार्यालयाबाहेर फटाके फोडले. त्यामुळे रागाच्या भरात आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांसह अन्य दोघांनी तरुणाला मारहाण करीत कार्यालयाची तोडफोड केली. ही घटना सोमवारी (ता. 18) दुपारी एकच्यादरम्यान छोटी गुजरी येथे घडली.

हेही वाचा - धक्कादायक! भोंदूबाबाचा एकाच घरातील चौघींवर बलात्कार, भूत उतरविण्याचा केला होता बहाणा

ग्रामपंचायत निवडणुकीत प्रीतेश दिनेश जयस्वाल (वय 31, रा. छोटी गुजरी) याची आई विजयी झाली. त्यामुळे मित्रांसह प्रितेशने त्याच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष केला. पराभव जिव्हारी लागलेल्या जिल्हा परिषद सदस्यासह त्यांचे समर्थक प्रितेशच्या कार्यालयात शिरले. हा आमचा एरिया आहे, असे म्हणत शिवीगाळ केली. तरुणाला धक्काबुक्की करीत कार्यालयाची तोडफोड केली. त्यात कार्यालयाचे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी प्रीतेश जयस्वाल याने यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून जिल्हा परिषद सदस्य विनोद जयस्वाल (वय 45, रा. यवतमाळ) यांच्यासह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: zp circle member beat youth in dorli of yavatmal