कशी भागणार लोकांची तहान?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

नागपूर - पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा परिषदेकडून तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार ९२४ बोअरवेल तयार करायचे असताना आतापर्यंत फक्त १५९ बोअरवेलच तयार करण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेची तहान भागणार कशी, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. 

पाणीटंचाईच्या उपाययोजनेचा दुसरा टप्पा सुरू आहे. परंतु, पाहिजे त्या प्रमाणात उपाययोजना पुढे सरकण्याचे नाव घेत नाही. एप्रिल महिना संपण्याच्या मार्गावर असूनही मंजुरीप्राप्त ९२४ पैकी केवळ १५९ बोअरवेलची कामे पूर्ण झालीत. या कामाच्या कासवगतीमुळे पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्‍यता आहे.

जिल्ह्यात बहुतांश, बोअरवेल्सची कामे ही ग्रामपंचायतस्तरावरूनच सुरू झाली आहे. 

जिल्हा परिषदेअंतर्गत सध्या काही कंत्राटदाराला बोअरवेल खोदकामाचे कंत्राट मिळाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी बोअरवेल्सच्या केसिंग पाइपमध्ये झालेल्या घोटाळ्यावरून जाणीवपूर्वक पाऊल टाकत पहिल्या टप्प्यात प्रत्यक्षात पाणीटंचाई असणाऱ्या गावांमध्येच बोअरवेलला परवानगी दिली आहे. त्यातही उपअभियंत्याचा स्थानिक मोका पाहणी अहवाल, ग्रामसभा ठराव, आदींच्या पडताळणीनंतर या बोअरवेल्सला मंजुरी दिली. जि. प.च्या कृती आराखड्यानुसार एक हजार बोअरवेल्स निर्मितीचे उद्दिष्टे आहे. एप्रिल, मे अतितीव्र टंचाईचे महिने आहे. कामाची कासवगती अशीच राहिल्यास तहानलेल्यांना पाण्यासाठी आणखी भटकावे लागेल.

टॅंकरव्दारे पाणीपुरवठा
टंचाईच्या उपाययोजनेसाठी जिल्ह्यात नळयोजना दुरुस्तीची सुमारे ३१५ कामे मंजूर असून, त्यापैकी १७५ वर कामे प्रगतिपथावर आहेत. तर ४७ खासगी विहिरींचे अधिग्रहन करण्यात आले आहे. तर तीन गावात चार टॅंकने पाणीपुरवठा होत आहे. हिंगणा तालुक्‍यातील इसासनी येथे एक, लाव्हा येथे दोन व कामठी तालुक्‍यातील मसाळा येथे एक अशा तीन गावांत चार टॅंकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Web Title: zp nagpur water shortage borewell