झेडपीच्या तिजोरी ठणठणगोपाळ

file photo
file photo

नागपूर : जिल्हा परिषदेच्या स्वमालकीच्या सेसफंडात एकही रुपया शिल्लक नसल्यामुळे अनेक विकासकामांची देयके अडकली आहे. वित्त समितीच्या बैठकीत याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.
जिल्हा परिषदेचा 36 कोटी 56 लाख 14 हजार 508 रुपयांचा अर्थसंकल्प अर्थ सभापती उकेश चौहान यांनी सादर केला होता. अर्थसंकल्पात शिक्षण, बांधकाम आणि आरोग्य विभागासाठी सर्वाधिक निधीची तरतूद केली आहे. ग्रामीण विकासाचे केंद्र बिंदू म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. ग्रामीण भागात करण्यात येणारे विविध विकासकामे ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात येतात. यातील काही कामे ही सेसफंडातून तर काही डीपीडीसीच्या निधीतून केली जातात.
स्टॅम ड्यूटी, स्थानिक विकास कर आदींच्या माध्यमातून येणाऱ्या रकमेच्या अनुषंगाने अर्थसंकल्पाचे नियोजन केले जाते. सेस फंडातून वैयक्तिक लाभाच्या योजनांसह बांधकाम, आरोग्य, महिला बालकल्याण, समाजकल्याण आदी विभागाअंतर्गतचे विकासकामे करण्यात येतात. आजवर जिल्हा परिषदेच्या सेसफंडात रक्कम नेहमीच शिल्लक राहत होती. मात्र, यंदा मार्च महिन्यात लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्याने सेसफंडात विविध माध्यमांतून येणारी रक्कम अडलेली आहे. मार्च महिना संपल्याने केलेल्या कामांचे देयके वित्त विभागाकडे सादर केली आहे. मात्र, तिजोरीत पैसाच नसल्याने सर्व देयके प्रलंबित आहेत. सोमवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या वित्त समितीमध्ये सदस्यांनी याची विचारणा केली असताना एकही रक्कम शिल्लक नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

जि.प.च्या सेस फंडात स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून होणारी अडकली होती. ती येण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच ती तिजोरीत जमा होईल व कंत्राटदारांना देयके दिले जातील.
- उकेश चव्हाण, सभापती, वित्त समिती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com