जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांचा मुख्यलयाला खो

नंदकिशोर वैरागडे
बुधवार, 18 जुलै 2018

या पंचायत समितीमध्ये दहाच्या आत पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या 27 असून 5 ते 2 पटसंख्या असलेली अकरा शाळा आहेत 0 पटसंख्या असलेली शाळा एक आहे. या प्रत्येक शाळेत दोन शिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोरची पंचायत समितीमधील देऊडभट्टी केंद्रात 662 विद्यार्थी या परिसरात शिक्षण घेत असून 31 शाळेमध्ये 69 शिक्षक कार्यरत आहेत.

कोरची : गडचिरोली जिल्ह्यातील पूर्वेस छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या कोरची पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या व्यक्तिगत सार्थ पोटी शिक्षण विभागाचे वाटोळे झालेले आहे.

कोरची पंचायत समिती मध्ये संच मान्यतेनुसार सध्यास्थितीत सन 2018 प्रपत्र अ 1 नुसार कोरची पंचायत समितीमध्ये पाच केंद्र असून कोरची केंद्रात 825 विद्यार्थी असून 76  शिक्षक कार्यात आहेत. बेत काठी केंद्रात 432 विद्यार्थी असून 42 शिक्षक आहेत. बोटेकसा केंद्रात 642 विद्यार्थी असून 53 शिक्षक कार्यरत आहेत. बेडगाव केंद्रात 808 विद्यार्थी असून 49 शिक्षक कार्यरत आहेत, तर कोरचीवरून छत्तीसगड राज्याची आठ किलोमीटरची सीमा पार करून जाव लागत असलेल्या देवुडभक्ती केंद्रात 662 विद्यार्थी असून 69 शिक्षक कार्यरत आहेत. या पाचही केंद्रामध्ये 3373 विद्यार्थी एक ते आठ वर्गात शिक्षण घेत असून 115 जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. यात 289 शिक्षक शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत, तर यांच्यावर देखरेख करण्यासाठी पाच केंद्र प्रमुखाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

पण जुलै 2015 पासून या ठिकाणी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी पद न भरल्याने कुरखेडा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आबाजी आत्राम यांना कोरची पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. पण या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आदिवासींची मुलं शिकले काय न शिकले का हे धोरण अवलंबून डॉक्टर बिपिन आबाजी आत्राम आपल्या मुलाच्या नावाने 0241297C एल आय सी चा गोरख धंदा सुरू केला. यातच शिक्षण विभागाकडे कमी नदी व्यवसायाकडे जास्त लक्ष देऊन एलआयसी काढणारा शिक्षकांना विशेष सूट देऊन आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा करून ठेवला. आठवड्यातून आठ दिवस अनुपस्थित असल्यास प्रति दिवस 200 रुपये घेऊन शिक्षकांच्या नियमित पगार काढला जात आहे.

या पंचायत समितीमध्ये दहाच्या आत पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या 27 असून 5 ते 2 पटसंख्या असलेली अकरा शाळा आहेत 0 पटसंख्या असलेली शाळा एक आहे. या प्रत्येक शाळेत दोन शिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोरची पंचायत समितीमधील देऊडभट्टी केंद्रात 662 विद्यार्थी या परिसरात शिक्षण घेत असून 31 शाळेमध्ये 69 शिक्षक कार्यरत आहेत. बोटावर मोजण्याइतकेच शिक्षक हे इनामदार काम करतात सर्व शिक्षक 80 ते 90 किलोमीटर अंतरावर ये जा करतात शिक्षकांना शाळेमध्ये आठ तास राहून विद्यार्थ्यांना शिकवणे अनिवार्य असताना शिक्षक मात्र अकरा बारा वाजता येतात परतीच्या मार्गाला दोन वाजेपासून लागतात. या परिसरात शासकीय आश्रम शाळेचे दोन शाळा असून त्याठिकाणी पटसंख्या खूप कमी आहे. आश्रम शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावल्यास जिल्हा परिषद शाळेमध्ये कमी पटसंख्या असलेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे वर्ग आश्रम शाळा  सुरू करून आश्रमशाळेचे शासकीय इंग्रजी माध्यमिक शाळा रूपांतर करून शिक्षण दिल्यास या परिसरातील आदिवासी मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले जाऊ शकते. जिल्हा परिषद शाळा संख्या ही दोन्ही आश्रम शाळेच्या टोलेजंग असलेल्या इमारतीत राहण्याची व शिक्षणाची सोय होऊ शकते. कोडगुल परिसरात शैक्षणिक दर्जा खूप खालावल्यामुळे या परिसरातील आदिवासी लोक आपल्या मुलांना गोंदिया कृ खेडा परिसरातील असं शाळेत शिक्षण घेण्यासाठी पाठवतात हा आकडा 200 ते 300 विद्यार्थी बाहेरगावी जाऊन शिक्षण घेत आहेत. शिक्षण व्यवस्था ही खूप ढिसाळ झालेली आहे त्यामुळे येथील पालक आपल्या मुलांना तिथल्या शाळेत टाकण्यास धजावत नाही. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा कोरची तालुक्यातील पगारापोटी शिक्षकावर व केंद्रप्रमुख यावर होणारा मासिक खर्च दोन कोटीच्या जवळपास आहे. ज्यांच्यावर ती हा खर्च केला जातो त्यांना त्यांचं शैक्षणिक विकास मातरम शून्य आहे. पण हेच शिक्षक आपला कुटुंब व आपले मुलं चांगल्या शाळेत शिकवण्या साठी आरमोरी, दैसाईगंज, ब्रम्हपुरी, कुरखेडा,याठिकाणी शाळेत प्रवेश करून शिकवीता तालुक्यातील एका ही शिक्षकाचा मुलगा कोरची पंचायत समिती जिल्हा परिषद 115 असलेल्या शाळेत शिकत नाही हे स्पष्ट आहे. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण घेता यावे अशी शासकीय यंत्रणा उभी केली असून तीच जर आपल्या स्वार्थासाठी शिक्षकांकडून एल आय सी व व शाळेतल्या दिवसाचे प्रति दिवस दोनशे रुपये घेऊन शिक्षण विभागाची वाट लावत असेल.

आदिवासींचा विकास होणार कसा या पंचायत समितीला पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी देणे एक विस्ताराधिकारी यांची नियुक्ती करणे फार गरजेचे आहे. तत्कालीन मुख्य कार्यपालन अधिकारी शंतनू गोयल यांनी कार्यरत असलेले प्रभारी गटशिक्षणाधिकारी आबाजी आत्राम यांना काढून नवीन गटशिक्षणाधिकारी ची नियुक्ती करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. पण मुख्य कार्यपालन अधिकारी जनता नव्या यांची बदली झाल्याने याहीवर्षी त्याच गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अधिनस्त शैक्षणिक दर्जा उंचावेल असे वाटत नाही. त्यामुळे कोरची पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आबाजी आत्राम यांची विभागीय चौकशी करून नवीन गटशिक्षणाधिकारी देणे खूप गरजेचे आहे. तरच कोरची तालुक्यातील शैक्षणिक दर्जा उंचावेल अशी बुद्धिजीवी असलेल्या जाणकारांचे मत आहे. तर शिक्षकांच्या शिक्षकांच्या पगारावर शाळा देखभाल दुरुस्तीवर ची घोडा बेरीज केल्यास आता असलेला पटसंख्येनुसार एका विद्यार्थ्यावर शासनाचे 68448 रुपये खर्च करण्यात येत असल्याचे दिसून आले हे विषेश.

कोरची तालुक्यात मसेली,कोरची, कोटगुल, ग्यारापती असे एकुण चार ठिकाणी शासकीय आश्रम शाळा असुन यात आदिवासी समाजातील विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र सद्या स्थितीत या आश्रम शाळेत अत्यअल्प विद्यार्थी शिक्षण घेतांना दिसून येत आहे कारण या आश्रम शाळांच्या शिक्षणाची दर्जा खालवलेली दिसुन येते. म्हणून पालकवर्ग आपल्या पाल्यांना एकात्मिक आदिवासी प्रकल्प द्वारे खाजगी इंग्रजी माध्यमाच्या नामांकित आश्रम शाळेत नागपूर, वर्धा, गडचिरोली,वडसा सारख्या ठिकाणी पाठविले जात आहे. तसेच दुसऱ्या तालुक्यातील व दुसऱ्या जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या खाजगी आश्रम शाळेत पटसंख्या वाढविण्यासाठी व शिक्षक वाचवण्यासाठी तालुक्याततून दोनशे ते तीनशे विद्यार्थ्यांना मेटाडोर किंवा खाजगी वाहनांच्या माध्यमाने ढोराप्रमाणे भरून नेतात या विषयाकडे आपल्या आदिवासी समाजातील लोकप्रतिनिधी व शासनाच्या ही दुर्लक्ष होत आहे. या तालुक्यातील निवासी आश्रमशाळांसाठी केंद्र शासन व राज्य शासन आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी कोटी रुपये खर्च करून काही शिक्षणाची दर्जेत वाढ होत नसेल तर तालुक्यात शासकीय इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळा मंजूर करून त्या विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण द्यावे. तसेच आश्रमशाळेत रिक्त असलेल्या पदे लवकरात-लवकर भरण्यात यावे. 

Web Title: ZP school in Gadchiroli