चौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना "सात'चा पाढा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

चौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना "सात'चा पाढा
नागपूर : शिक्षणावर शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो. डिजिटल शिक्षणाच उपक्रम राबविण्यात येत आहे. शंभर टक्के शाळा डिजिटल झाल्याचा गाजावाजा करण्यात येत असून, प्रशासनाने आपली पाटही थोपटून घेतली आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती काही औरच आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील चौथ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीत नाव लिहिणे तर सोडाच साधा "सात'चा पाढा येत नसल्याचे विदारक चित्र आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या नावे महिन्याला हजारो रुपये घेणारे शिक्षक करतात तरी काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

पारशिवनी तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या गाव अंबाझरी शाळेतील हे विदारक चित्र जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शदर डोणेकर यांनी या शाळेला भेट दिल्यानंतर पुढे आले. या शाळेत अंगणवाडी आणि चौर्थ्या वर्गापर्यंत शाळा आहे. वर्ग 1 ते वर्ग 4 पर्यंत शाळेत 17 विद्यार्थी असून, चौथ्या वर्गात तीनच विद्यार्थी आहेत. शाळेची स्थिती बिकट आहे. अंगणवाडीची इमारती मोडकळीस आली असून, पाणी गळते. मात्र, यासंदर्भात एकाही शिक्षकाने तक्रार केली नाही. येथील विद्यार्थ्यास आपले नाव इंग्रजीत सांगता आले नाही. एक ते सहापर्यंतचे पाढे विद्यार्थ्यांनी न चुकता सांगितले. मात्र, त्यानंतरचा एकही पाढा आला नाही. शिक्षक आठवड्यातून एकदाच इंग्रजीत शिकवीत असल्याचे एक विद्यार्थ्याने सांगितले. जिल्हा परिषदेतील अनेक शाळांची अशीच स्थिती असल्याचे सांगण्यात येते.
शिक्षक राजकारणात व्यस्त
शैक्षणिक सत्र होऊन दीड महिन्याचा काळ लोटला. परंतु अद्याप अनेक शाळांना पाठ्यपुस्तकाच मिळाले नसल्याचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी उपस्थित केला. मात्र, शिक्षक बदली आणि समायोजनासाठी भांडत आहेत. काही शिक्षक राजकारणात व्यस्त आहे. त्यांचे विद्यार्थ्यांकडे लक्ष नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना चांगले गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळणार कसे, हाच खरा प्रश्‍न आहे.

Web Title: ZP student can't tell multiplying number