मानवनिर्मित सगळ्यात मोठा धबधबा...(व्हिडिओ)

शनिवार, 28 जुलै 2018

गुइयांग (चीन) - धबधब्याचं आकर्षण सगळ्यांनाच वाटतं. तुम्ही अनेक नैसर्गिक धबधबे बघितले असतील. परंतु, चीनमध्ये जगातला सगळ्यात मोठा मानवनिर्मित धबधबा आहे. हा धबधबा एका मोठ्या इमारतीवर तयार करण्यात आला आहे. एखाद्या साय-फाय चित्रपटातील वाटावा असा हा धबधबा दिसत असल्याने सध्या तो आकर्षण ठरला आहे. 

'लिबियन इंटरनॅशनल प्लाझा' या इमारतीवर तयार करण्यात आलेला हा धबधबा येवढा उंच आहे की, त्याच्या उडणाऱ्या तुषारांमध्ये कधीकधी इंद्रधनुष्याचेही दर्शन होते. या धबधब्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. 

या धबधब्याची उंची 108 मीटर एवढी आहे. धबधब्यासाठी या इमारतीच्या खाली चार मजले येवढा पाणिसाठा करण्यासाठी जागा आहे. धबधब्याच्या पाण्यासाठी पावसाच्या पाण्याचे आणि इमारतीत वापरल्या जाणाऱ्या इतर पाण्याचे रिसायकलिंग केले जाते. 

हा धबधबा सुरु ठेवण्यासाठी प्रचंड प्रमाणात उर्जा लागते. त्यामुळे त्यासाठी बराच खर्च येत असल्याने सध्या काही विशेष कार्यक्रमाच्या वेळी किंवा एखाद्या विशेष दिवशीच हा धबधबा सुरु करतात. त्याही वेळेला जास्तित जास्त 10 ते 20 मिनिटेच हा धबधबा सुरु ठेवला जातो.